मुंबई : अगदी गगनाला भिडणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहताच सामान्यांना मोठा झटका बसला आहे. आता तर पेट्रोलने आपला गेल्या 55 महिन्यांतील उच्चांक गाठला असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. तसेच आता पर्यंतच्या डिझेलच्या दराने  देखील सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आता या इंधनांच्या दरात कपात होण्याची शक्यता धूसर आहे. वित्त मंत्रालयाचा पेट्रोल आणि डीझेलवरील एक्साइज ड्यूटी कमी करण्याच्या हेतू दिसत नसल्याच स्पष्ट होत आहे. सोमवारी पेट्रोल आणि डीझेलचे दर गेल्या 55 महिन्यांच्या उच्चांक गाठणारे आहे. आणि हे सामान्यांना सुखावणारे नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मे २०१४ मध्ये भारतीय बास्केट क्रूड १०६.८५ डॉलर प्रतिबॅरल. ते जानेवारी २०१६ मध्ये २९.८०८ डॉलरपर्यंत घसरले. नोव्हेंबर २०१४ पासून जानेवारी २०१६ दरम्यान पेट्रोल-डिझेलवर ९ वेळा अबकारी शुल्क वाढवले. १५ महिन्यांत पेट्रोलवर शुल्क ११.७७ व व डिझेलवर १३.४७ रुपये वाढले. तेव्हा पेट्रोलियम मंत्री म्हणाले होते, क्रूड महाग होईल तेव्हा अबकारी शुल्कात कपात करू असे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. 


क्रूड अडीच पटींनी महागले


२ वर्षांत क्रूड अडीचपट महाग. सध्या ७३.५ डॉलर. दरम्यान सरकारने अबकारी शुल्कात एकदा कपात केली. ऑक्टोबर २०१७ मध्ये पेट्रोल-डिझेलवर शुल्क २-२ रु. ने घटवले होते. केंद्राने राज्यांना व्हॅट कपात सांगितली. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेशने व्हॅट कपात केली.


आताचा पेट्रोल आणि डीझेलचा दर 


सोमवारी पेट्रोलचे दर ८३.३३ रुपये या ५५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले. दिल्लीत ते ७४.५० रुपये झाले. तेथे याआधी १४ सप्टेंबर २०१३ ला ७६.०६ रुपये दर होते. डिझेलही ६५.७५ या उच्चांकावर पोहोचले. तरीही केंद्र अबकारी शुल्कात कपातीस तयार नाही. ३ वर्षांपूर्वी क्रूडचे दर घटल्यानंतर शुल्क वाढवत पेट्रो. मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले होते, लोकांवर बोजा वाढल्यानंतर कपात करू. आता मात्र नकार दिला आहे.