मुंबई : लॉकडाऊननंतर महागाई आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त त्रास देईल, याचे संकेत मिळू लागले आहेत. लॉकडाऊन सुरु होण्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली असली तरी आज १२ व्या दिवशीही ऑईल मार्केटींग कंपनीने (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) भाव वाढविले आहेत. पेट्रोलच्या दरात ०.५३ रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमती ०.६४ रुपयांनी वाढल्या आहेत. बुधवारी पेट्रोलचा दर वाढून ७७.८१ रुपये झाला. तर डिझेल दरही वाढविण्यात आला आहे. डिझेलची किंमत ७६.४३ रुपये प्रतिलिटर झाली.


महानगरांमध्ये इंधन दर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत पेट्रोल आता प्रतिलिटर ८४.६८ रुपये तर डिझेल ७४.३३ रुपये प्रतिलिटर झाले आहे. त्याचबरोबर चेन्नईतील लोकांना एक लिटर पेट्रोलसाठी ८१.३९आणि डिझेलसाठी ७४.३३ रुपये मोजावे लागतील. तर कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ७९.६१ आणि डिझेलची किंमत७१.९७ रुपयांवर पोहोचली आहे.


कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण


दुसरीकडे, कमी मागणीमुळे व्यापाऱ्यांनी आपली मागणीही कमी केली आहे. बुधवारी वायदा बाजारात कच्चा तेलाची किंमत १.१९ टक्क्यांनी घसरून २८९५ रुपये प्रति बॅरल झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये कच्चे तेलाची डिलिव्हरीची किंमत ३५ रुपयांनी किंवा ११.१९ टक्क्यांनी घसरून २८५९ रुपये प्रति बॅरल झाली.