मुंबई : महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. तीन दिवसांच्या दिलासा दिल्यानंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol, Diesel Price Increased)  वाढविण्यात आले आहेत. आजच्या किंमतींपूर्वी देशात पेट्रोल आणि डिझेल इतका महाग कधीच नव्हता. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा  परिणाम  इतर सेवांवरही होतो.


पेट्रोलच्या दरामुळे महागाईत वाढ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दिल्लीत पेट्रोल २६ पैशांनी महाग झाले आहे आणि प्रतिलिटर ९१ रुपये इतकी किंमत पार केली आहे. दिल्लीत पेट्रोल आज प्रतिलिटर ९१.१७ रुपये आहे. जे आतापर्यंतचे सर्वात जास्त दर आहेत. मुंबईतही पेट्रोल १३ पैशांनी महाग झाले आहे तर  ९७.४७ रुपये प्रतिलिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल आज प्रति लिटर ९१.३५ रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल ९३.१७ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. काय आहेत  आजचे पेट्रोल दर जाणून घेऊया.


राज्य         कालचे दर  आजचे दर 


दिल्ली  -                ९०.९३            ९१.१७
मुंबई     -                ९७.३४            ९७.४७
कोलकता  -            ९१.१२            ९१.३५
चेन्नई   -                 ९२.९०           ९३.१७


या वर्षात २६ वेळा वाढले पेट्रोल-डीझेलचे दर


 यावर्षी आतापर्यंत पेट्रोलच्या दरात २६ पटीने वाढ झाली आहे. यावर्षी १ जानेवारीला दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८३.७१ रुपये होती, जी आता ९१ रुपयांच्या पुढे गेली आहे. एकूणच पेट्रोल ७ रुपये ४६ पैशांनी वाढले आहे.  


डीझेलच्या दरामुळे महागाईत वाढ


पेट्रोल नंतर डिझेलच्या वाढत्या दराबद्दल बोलूया. मुंबईत डिझेल प्रति लिटर ८८.६० रुपये आहे, जो आतापर्यंतचा सर्वात महाग दर आहे. दिल्लीत डिझेल प्रति लिटर ८१.४७ रुपये आहे. कोलकतामध्ये हा दर प्रति लिटर ८४.३५ रुपये  आहे तर चेन्नईमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर ८६.४५ रुपये आहे. काय आहेत आजचे डीझेल दर जाणून घेऊया.


राज्य        कालचे दर  आजचे दर 


दिल्ली  -               ८१.३२              ८१.४७
मुंबई     -               ८८.४४              ८८.६०
कोलकता  -           ८४.२०             ८४.३५ 
चेन्नई   -                ८६.३१             ८६.४५


कसे पाहायचे पेट्रोल आणि डिझेलचे दर


तुम्ही SMS द्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील पाहू शकता. इंडियन ऑईल IOC ने आपल्याला सुविधा दिली आहे की, आपण आपल्या मोबाइलमध्ये   आपल्या शहराचा कोड आरएसपी (RSP) लिहून या  9224992249 क्रमांकावर SMS पाठवा. तुमच्या मोबाईलवर त्वरीत आपल्या शहराचा पेट्रोल-डीझेल दर  तुम्ही पाहू शकता.  प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो जो IOC आपल्याला त्याच्या वेबसाइटवर देतो.


रोज सकाळी ६ वाजता बदलतात दर


दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्यूटी(Excise duty), डीलर कमिशन आणि इतर अनेक गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.


वाढत्या कच्च्या तेलाच्या दरावर काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री


पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावर कॉंग्रेस सतत मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, हिवाळ्याचा हंगाम संपताच तेलाच्या किंमती कमी होतील. धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढत्या किंमतींचादेखील तेलाच्या किंमतींवर परिणाम होतो. पेट्रोलियममंत्र्यांचे दावे त्यांच्या जागी आहेत पण या क्षणी विक्रमी किंमतीने सामान्य माणसाचे आयुष्य बदलले आहे.