मुंबई : मंगळवारी (9 फेब्रुवारी) मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर नव्या विक्रमी पातळीवर पोहोचले. तेल कंपन्यांनी दर वाढवल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज प्रतिलिटर 35 पैशांची वाढ झाली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत पेट्रोलचे दर 33 पैसे प्रति लिटरने वाढून 87.30 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 77.48 रुपये प्रती लिटर झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 93.83 आणि 84.36 प्रति लिटर वर पोहोचले आहेत. चारही महानगरांमध्ये हे दर सर्वाधिक आहे. चेन्नईत पेट्रोल 89.70 रुपये आणि डिझेल 82.66 प्रति लीटर तर कोलकातामध्ये पेट्रोल 88.63 आणि डिझेल 81.06 रुपये प्रति लीटर झालं आहे.


सोमवारी ब्रेंट तेलाचे दर प्रति बॅरल 60 डॉलरच्या वर गेले आहे. प्रति बॅरल 1.26 टक्क्यांनी वाढून ते 60.19 डॉलर झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी बचाव पॅकेजच्या घोषणेनंतर गेल्या एका आठवड्यापासून कच्चा तेलांच्या दरात वाढ होत आहे. पुरवठा कमी केल्याने आणि अमेरिकेत मदत पॅकेजच्या आशेनेही क्रूडला पाठिंबा दर्शविला. उत्पादन शुल्क, डीलर कमिशन व इतर चार्जेस जोडल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.


उल्लेखनीय बाब म्हणजे बजेट 2021-22 मध्ये पेट्रोल वर 2.5 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 4 रुपये प्रति लीटर 'एग्री इन्फ्रा सेस' लावला जाणार आहे. पण सामान्य जनतेवर याचा कोणताही परिणाम होणार नाहीये. 


नोएडामध्ये पेट्रोल 86.41 आणि डिझेल 77.90 रुपये प्रति लीटर, रांचीमध्ये पेट्रोल 85.57 आणि डिझेल 81.96 रुपये प्रति लिटर आहे. पटनामध्ये पेट्रोल 89.74 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 82.66 रुपये प्रति लिटर झालं आहे.