पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, पाहा आजचे दर
राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 71.70 रुपये प्रति लिटरने वाढली आहे. जी जवळपास तीन वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचली आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 71.70 रुपये प्रति लिटरने वाढली आहे. जी जवळपास तीन वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचली आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या आकडेवारीनुसार, 1 जुलै रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर लिटरमागे 73.60 रुपये होता. तेल किमतीच्या दैनिक आढाव्यानुसार पेट्रोल गुरुवारी 17 पैशांनी महागलं. आज 14 पैशांनी यामध्ये आणखी वाढ झाली. दिल्लीत डिझेलची किंमत प्रति लिटर 62.44 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, कच्च्या तेलाच्या किमतींमुळे देशांतर्गत बाजारात तेल किमतींवर लगेच परिणाम होतो.
पेट्रोलियम उत्पादने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) च्या कक्षेमधून वगळली जातात. राज्यांनी लावलेल्या टॅक्सनुसार, किमतींमध्ये फरक प्रत्येक राज्यांमध्ये पाहायला मिळतो. मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 79.44 रुपये आहे. कोलकातामध्ये, प्रति लिटर 74.28 रुपये आणि चेन्नईत प्रति लिटर 74.20 रुपये प्रतिलिटर
29 वस्तू आणि 53 सेवांवर जीएसटी रेट कमी झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत मात्र जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही.
पेट्रोलचे दर किती
दिल्ली- 71.70
कोलकाता- 74.42
मुंबई- 79.58
चेन्नई- 74.35
डिझेलचे दर किती
दिल्ली -62.44 प्रति लिटर
कोलकाता - 65.10 प्रति लिटर
मुंबई - 66.50 प्रति लिटर
चेन्नई - 65.83 प्रति लिटर