नवी दिल्ली : पेट्रोलियम पदार्थ्यांच्या दरवाढीचा सिलसिला आज सलग सोळाव्या दिवशीही सुरूच आहे.  देशभरात पेट्रोलच्या किंमती १६ पैसे तर डिझेलच्या किंमती १५ पैशांनी वाढल्या आहेत. १४ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आता घट व्हायला सुरुवात झाली आहे.  काल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरायला सुरुवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रशिया आणि सौदी अरेबियानं कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कच्चे तेल स्वस्त होण्याचा हा सिलसिला यापुढेही सुरू राहिल असा बाजार तज्ज्ञांचा होरा आहे. इकडे डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या रुपयालाही काल ब्रेक लागलाय. सोमवारी एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ३५ पैसे वधारली. त्यामुळे देशांतर्गत तेल कंपन्यांना होणाऱ्या नुकसानाला आळा बसण्यास मदत होईल. अर्थात त्याचा फायदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर होऊ खाली घसरण्यास सुरूवात होण्याची चिन्हं आहेत.