मुंबई : शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात झाल्यानंतर शनिवारी किंमती स्थिर राहिल्या. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर २० मे नंतर उतरल्याचे पाहायला मिळाले. २९ मेला महागाईचा उच्चांक गाठल्यानंतर पेट्रोल २.०८ रुपयांनी स्वस्त झाल. शनिवारी तेल कंपन्या (HPCL, BPCL, IOC) यांच्याकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणता बदल केला गेला नाही. शनिवारी पेट्रोलचे दर दिल्लीमध्ये ७६.३५ रुपये, कोलकात्यात ७९.०२ रुपये, मुंबईत ८४.१८ रुपये आणि चेन्नई ७९.२४ रुपये प्रति लीटर होते. डिझेलच्या किंमतीमध्ये ४ दिवस कोणताच बदल झाला नाही. दिल्लीमध्ये डिझेलचे दर ६७.८५ रुपये, कोलकातामध्ये ७०.४० रुपये, मुंबईत ७२.२४ रुपये आणि चेन्नई ७१.६२ रुपये प्रति लीटर आहे.


दर पुन्हा वाढणार 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये हलकी वाढ झाली आहे. अमेरिकी कच्च्या तेलाचा भाव वाढून ६७ डॉलर झालाय. ब्रेंट क्रूडची किंमत ७६ डॉलर पर्यंत पोहोचली आहे.डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण झाल्याचे दिसत आहे. प्रति डॉलर रुपये ६७.९५ पर्यंत आहे आणि यामध्ये आज ३३ पैशांनी घसरण झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.