Petrol-Diesel Price : सतत होणाऱ्या इंधन दरवाढीला अखेर ब्रेक
जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर
मुंबई : सध्या पेट्रोल डिझेलच्या दरात सतत वाढ होच आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात सतत वाढ होत असल्यामुळे नागरिकांना आर्थिक आडचणींचा सामना करावा लागणार आहे. जुलै महिन्यात 7 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. पण आज डिझेलचे दर घटले आहेत. देशातील चार मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलचे दर 101 रूपयांवर पोहोचले आहेत. देशात सर्वात जास्त दर राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आहे. याठिकाणी 1 लिटर पेट्रोलसाठी तब्बल 11.53 रूपये मोजावे लागत आहेत. तर डिझेल जवळपास 103 रूपये लिटरने मीळत आहे.
4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर
शहर कालचे दर आजचे दर
दिल्ली 100.91 101.19
मुंबई 106.93 107.20
कोलकाता 101.01 101.35
चेन्नई 101.67 101.92
महत्त्वाचं म्हणजे सतत वाढणाऱ्या डिझेलच्या दरात घट झाली आहे. डिझेलचे दर 17 पैशांनी घसरले आहेत. आज मुंबईत डिझेलसाठी 97.29 मोजावे लागत आहेत.
4 मेट्रो शहरांमधील डिझेलचे दर
शहर कालचे दर आजचे दर
दिल्ली 89.88 89.72
मुंबई 97.46 97.29
कोलकाता 92.97 92.81
चेन्नई 94.39 94.24
सांगायचं झालं तर महाराष्ट्रात देखली पेट्रोल डिझेलच्या दरांनी 100 रूपयांचा आकडा पार केला आहे. वाचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील पेर्टोलचे दर...
शहर पेट्रोल
अकोला 107.08 रूपये
अमरावती 108.29 रूपये
जळगाव 107.26 रूपये
नागपूर 107.67 रूपये
परभणी 109.81 रूपये
पुणे 106.88 रूपये
ठाणे 107.05 रूपये