आजही पेट्रोल महागलं, पाहा किती आहेत दर
कालच्यापेक्षा आज पेट्रोल 9 पैशांनी महागलं आहे.
मुंबई : सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असताना पेट्रोल डीझेलच्या दरवाढीने मात्र सर्वांना बेजार करुन सोडलय. दरदिवशी या दरात वाढच होताना दिसत असून यातून काहीच दिलासा समोर दिसत नाहीयं. आज डिझेलचे दर स्थीर असले तरीही पेट्रोलच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळतेय. आज मुंबईत पेट्रोल 89.69 रुपये लीटरने उपलब्ध आहे. म्हणजेच कालच्यापेक्षा आज पेट्रोल 9 पैशांनी महागलं आहे.
इंधन दरवाढीची बातमी आता नवी नाही. गेल्या साधरण महिन्याभरात पेट्रोलच्या दराचा शंभरीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. गेल्या दोन तीन दिवसात वेग थोडा मंदावलाय. पण त्यासोबतच गेल्या दोन तीन दिवसात आणखी एक महत्वाचा बदल दिसून येतोय.
पेट्रोल दरवाढीच्या सत्रात आता डीझेलनं पेट्रोलची साथ सोडलीय. तुम्ही म्हणाल नेमकं झालंय काय?..झालंय असं की पेट्रोलची दरवाढ इतकी झपाट्यानं होतेय...की त्यासोबत धावणं आता डीझेलला शक्य नाहीय...त्यामुळेच आज सलग तिसऱ्या दिवशी डीझलचे दर स्थिर असून पेट्रोलच्या भावात 9 पैशाची वाढ झालीय. बुधवारचा एक दिवस सोडला, तर पेट्रोलच्या दरात गेल्या दोन आठवड्यात म्हणजे किमान पंधरा दिवसात दररोज वाढ झाली. सामान्यांचं कंबरडं दरवाढीनं मोडलंय..
देशातलं प्रत्येक राज्य पेट्रोल आणि डिझेलवर आपल्या गरजे नुसार कर लावतं. महाराष्ट्र सरकारची ही गरज इतकी मोठी आहे की इंधनावरील करांचा बोजा तब्बल 39 टक्के आहे. म्हणजे हिशोब साधा आहे... तुम्ही जर एक लीटर पेट्रोल भरलं तर तुम्ही दिलेल्या सुमारे 90 रुपयांपैकी राज्यसरकारच्या तिजोरीत तब्बल 35 रुपये 10 पैसे जातायतय...त्य़ामुळे पेट्रोलमुळे सरकारच्या ज तिजोरीत किती पैसा जातो याचा विचारच केलेला बरा.
वाढ सुरूच
पेट्रोलच्या दरात काल ६ पैशांची दरवाढ करण्यात आली होती. काल मुंबईत पेट्रोल 89.60 रुपये तर डिझेल 78.42 रूपये दराने विकलं जात होत. आज यामध्ये वाढ होऊन 8 गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होऊन 89.69 रुपये झालं आहे.
दिवाळीवरही संकट?
पेट्रोल-डिझेलच्या दरांनी अनेक ठिकाणी नव्वदी गाठली आहे. येणाऱ्या काळात आणखी वाढ होण्याची चिन्ह आहेत. पेट्रोल दरवाढीचा फटका इतर गोष्टींच्या बाबतीतही बसू शकतो. यामुळे वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता असते. यंदाची दिवाळी ही खिशाला कात्री लावणारी ठरण्याची शक्यता आहे.