1963 Petrol Bill Viral : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे फोटो आणि व्हिडिओ नागरीकांचे एकतर मनोरंजन करत असतात, अथवा त्यांना आश्चर्याचा धक्का देत असतात. असाच आश्चर्याचा धक्का देणारा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो एका जुन्या पेट्रोल पंपाचा (Petrol Bill Viral) आहे. या फोटोतील पेट्रोलचे दर (Petrol Price)पाहून अनेकांना धक्का बसला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक फोटो व्हायरल होत असतात. यामधील काही फोटो खूपच आश्चर्यकारक असतात, कारण त्यावर खरचं विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न पडतो.असाच एक फोटो समोर आला आहे.हा फोटो एका पेट्रोल पंपाच्या (Petrol Bill Viral) पावतीचा आहे. पेट्रोल पंपाची 1963 ची पावती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाच लिटर पेट्रोलची किंमत (Petrol Price) इतकी लिहिली आहे की आजच्या 1 लिटर तेलाच्या किंमतीत तुम्ही 100 लिटरपेक्षा जास्त पेट्रोल खरेदी केले असेल. या बिलातील पेट्रोलचे दर पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. 


फोटोत काय? 


सोशल मीडियावर भारत पेट्रोल सप्लाय कॉ. चा 'कॅश मेमो' व्हायरल झाला आहे. हा 'कॅश मेमो' 2 फेब्रुवारी 1963 चा आहे. हा मेमो पेट्रोल पंपावर (Petrol Price) इंधन भरल्यानंतर ग्राहकाला दिला असावा, असे मानले जात आहे. यामध्ये पाच लिटर पेट्रोलच्या किंमतीसमोर 3 रुपये 60 पैसे असे लिहिले आहे. त्यानुसार एक लिटर पेट्रोलची किंमत (Petrol Price) 72 पैसे आहे. आणि आजच्या पेट्रोलच्या दराशी तुलना केली तर हे दर पार गगनाला भिडलेत. कुठे त्याकाळी एक लिटर 72 पैसे, आणि आता लीटरमागे 100 रूपये. या दोन्ही दरात खुपच तफावत आहे. 


दरम्यान या जुन्या पेट्रोलच्या बिलावर (Petrol Bill Viral) लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. काहिंनी हे फेक बिल असल्याचे म्हटले आहे.तर काहिंच्या मते त्या काळी इतका चांगला फोटो येणारा कॅमेरा नव्हता, असे त्याचे म्हणणे आहे. तर नेटकऱ्यांनी हे बिल पाहून यालाच खरे अच्छे दिन म्हटले आहे. नेटकऱ्यांनी हे दर पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



हा फोटो (Petrol Bill Viral) याआधी देखील व्हायरल झाला होता. हा फोटो 2015 साली सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला होता. तसेच याआधी सोशल मीडियावर रेस्टॉरंटमध्ये 26 रुपयांत पोटभर जेवण्याचे बिल,  'रॉयल ​​इन फील्ड'ची बुलेट 350 सीसी बाईकचे जु्ने बिल आणि 18 रुपयांना सायकल खरेदीचे बिल व्हायरल झाले होते. सध्या या पेट्रोलच्या बिलाची सोशल मीडियावर चर्चा आहे. हे बिल पाहून सारेच आश्चर्यचकीत आहेत.