मुंबई : देशात गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. मंगळवारी पुन्हा एकदा ही वाढ पाहायला मिळाली आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 14 पैशांनी वाढ झाली असून आता दर 80.87 रुपये प्रती लीटर झाला आहे. तक डिझेलच्या दरात 14 पैसे प्रती लीटर वाढ झाली असून 72.97 रुपये प्रती लीटर दर झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच मुंबईच्या किंमतीत ही वाढ झाली आहे मंगळवारी 14 पैशांनी वाढ झाली असून दर 88.26 रुपये प्रती लीटर झाला आहे. डिझेलवर 15 पैसे प्रति लीटर वाढ झाली असून 77.47 रुपये प्रती लीटर रेकॉर्ड रेट पोहोचला आहे. 



एकीकडं पेट्रोल आणि इंधनच्या भाववाढीनं देशातील जनता हैराण असताना, राजस्थानच्या नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळालाय. राजस्थान सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट ४ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल अडीच रूपयांनी स्वस्त होणार आहे.