नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटन EPFOने आपल्या सदस्यांसाठी 7 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा देत आहे. ज्या लोकांच्या पगारातून PF कापला जातो. ते सगळे एम्प्लॉईज डिपॉजिट लिंक्ज इंश्योरंन्स स्किम, 1976 च्या अंतर्गत मिळणाऱ्या विम्याचा लाभ घेऊ शकतात. वाचा कसे ते.


आता 7  लाखांपर्यंत मिळू शकते कव्हर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी विम्याची रक्कम 6 लाख रुपये होती. श्रम मंत्री संतोष गंगवारच्या अध्यक्षतेखाली EPFOच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT)ने 9 सप्टेंबर 2020 रोजी ती 7 लाख रुपये केली.


कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 7 लाख रुपये मिळतील


या योजनेअंतर्गत सदस्याचा आजारपण, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास क्लेम करता येतो. म्हणजेच कोणत्याही कर्मचारी सदस्याचा कोविड 19 च्या संसर्गाने मृत्यू झाल्यास. त्याच्या नातेवाईकांना EDLIच्या अंतर्गत 7 लाख रुपये मिळू शकतात. विम्याचा दावा करण्यासाठी कोणत्याही कालावधीचा नियम नाही.


कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास क्लेम कोण करणार?


ही रक्कम नॉमिनीच्या वतीने पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यावर क्लेम केली जाते. जर कोणीही नॉमिनी नसेल तर,  कायदेशीर उत्तराधिकारीला हा क्लेम दिला जातो.


विमा कवर फ्री


या योजनेच्या अंतर्गत कर्मचाऱ्याला कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही. म्हणजेच विमा कवर सब्सस्क्राइबरला फ्री मिळतो. पीएफ खात्यासह लिंक होत असतो. कोविड19 मुळे मृत्यू झाल्यासही क्लेम केला जाऊ शकतो.


 कागदपत्रांचे सत्यापन


कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला क्लेम करण्यासाठी फॉर्म 5 IF जमा करावा लागतो. हा फॉर्म कंपनी सत्यापित करते. कंपनी उपलब्ध नसेल तर गॅजेटेड अधिकारी, मॅजिस्ट्रेट, ग्रामपंचायत अध्यक्ष किंवा स्थानिक  प्रशासनाकडून सत्यापित करता येईल.