मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्था पीएफओने (PFO) खातेधारकांच्या खात्यातील रक्कमेवरील व्याज (PF Intrest) पाठवायची सुरुवात केलीय. त्यामुळे खात्यात लवकरच व्याजाची रक्कमेच्या उल्लेखासह नोंद दिसेल. पीएफओने एका खातेधारकाच्या ट्विटला रिप्लायद्वारे 31 ऑक्टोबरपासून व्याजाची रक्कम पाठवण्यात येत असल्याची माहिती दिली. पीएफधारकांच्या खात्यात दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा होते. मात्र या वर्षभरात जमा होणाऱ्या या रक्कमेवर पीएफओकडून व्याज दिलं जातं. व्याजाची संपूर्ण रक्कम ही पीएफधारकाच्या खात्यात जमा केली जाते. (pf provident fund organisation credited intrest on pf holder amount know how to check online and via messeging)


व्याज कसं तपासायचं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएफ खात्यातील रक्कमेवर व्याज मिळालंय की नाही, हे जाणून घेणं फार सोपं आहे. यासाठी पीएफओच्या वेबसाईटद्वारे जाणून घेऊ शकता. तसेच 7738299899 या क्रमांकावर ‘EPFOHO UAN ENG’ असा मेसेज पाठवून जाणून घेऊ शकता. इतकंच नाही तर 9966044425 या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉलद्वारेही जाणून घेऊ शकता. तसेच उमंग एपद्वारे (Umang App)जाणता येतं. 


ऑनलाईन कसं चेक करायचं?  


पीएफओच्या epfindia.gov.in या वेबसाईटवर जा. 


Our Services या टॅबवर क्लिक करा. यानंतर For Employees यावर क्लिक करा. 


नवीन पेज ओपन होईल. तिथे Member PassBook वर क्लिक करा. इथे यूएएन नंबर (Universal Account Number) आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. 


यानंतर पासबूक ओपन होईल. इथे तुम्हाला काम करत असलेल्या आणि याआधीच्या कंपन्याकडून जमा करण्यात आलेल्या रक्कमेवर किती व्याज मिळालं आहे हे समजेल.