Pink Tax बद्दल कधी ऐकलंय का? व्यावसायिकेने उठवला आवाज, Video Viral
Kiran Mazumdar-Shaw Pink Tax: किरण मूजुमदार शॉ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी पिंक टॅक्सबाबत आवाज उठवला आहे.
Kiran Mazumdar-Shaw: तुम्ही इनकम टॅक्स, जीएसटी याबाबत तुम्ही कधी ऐकलं असेलच पण तुम्ही कधी पिंक टॅक्सबाबत ऐकलं का? पिंक टॅक्स हा महिलांच्या सामानांवर लावण्यात येणारा कर आहे. अनेकांना अजूनही पिंक टॅक्सबाबत माहिती नाहीये. मात्र, आता हा मुद्दा चर्चेत आला आहे. व्यावसायिका किरण मजूमदार शॉ यांनी विरोधात आवाज उठवला आहे.
किरण मजूमदार शॉ यांनी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तु्म्हीदेखील विचारात पडू शकता. व्हिडिओत सांगितले आहे की, पुरुषांचे प्रोडक्ट आणि महिलांच्या प्रोडक्टच्या किंमतीत अंतर असते. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की डॉ. संजय अरोरा याबाबत माहिती देत आहेत. संजय अरोरा एकाच कंपनीच्या व एकाच साइजच्या लिप बामबद्दल माहिती देत आहे. येथे पुरुषांचा लिप बाम 165 रुपयांचा आहे तर महिलांचा लिपबाम 250 रुपयांना विकला जात आहे.
एकाच कॅटगरीत असून प्लेन रेजरसाठी पुरुषांना 70 रुपये मोजावे लागतात तर महिलांना 80 रुपये द्यावे लागतात. त्याचप्रमाणे एकच डिओड्रंट पण पुरुषांना 105 रुपये आणि महिलांना 115 रुपये मोजावे लागतात. अशा अनेक प्रोडक्टबाबत संजय अरोरा यांनी व्हिडिओत माहिती दिली आहे. किरण मजूमदार शॉ यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टला आत्तापर्यंत 5 लाखाहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत.
दरम्यान, पिंक टॅक्सहा सरकारी कर नसून सरकारचा त्याच्याशी काहीच संबंध नाहीये. पण कंपन्यांद्वारे फक्त महिलांसाठी बनवण्यात आलेल्या प्रोडक्टवर हा टॅक्स लावण्यात येतो. याचा अर्थ असा आहे की वुमन केयरच्या प्रॉडक्टवर कंपनी महिलांकडून अधिकचे पैसे वसुल करतात. आता किरण मजूमदार शॉ यांनी याविरोधात आवाज उठवला आहे.
या व्हिडिओवर अनेक युजर्सही त्यांचे मत व्यक्त करत आहेत. अनेकांनी म्हटलं आहे की, या विरोधात महिलांना आवाज उठवला पाहिजे. तर, काही युजर्स याला चुकीचे असल्याचे म्हणत आहेत. तर, काही चिंता व्यक्त करत आहे की, हे पाहून कंपन्या पुरुषांच्या वस्तुंचीही किंमत वाढवतील. पिंक टॅक्सवर तुमचं काय मत आहे. हे आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.