Trending News Today: तुम्ही काम करत असताना अचानक तुम्हाला बँकेचा मेसेज येतो. तुमच्या खात्यात अचानक करोडो रुपये जमा झाल्याचे कळते तर तुम्ही काय कराल. असाच एक प्रसंग चेन्नई येथील एका व्यक्तीसोबत घडला आहे. मेडिकल दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या बँक खात्यात अचानक 753 कोटी रुपये जमा झाले. अचानक इतका धनलाभ झाल्याचे पाहून तोदेखील आश्चर्यचकित झाला. नेमका हा काय प्रकार आहे हे समजून घेण्यासाठी तो बँकेत गेला. मात्र, तिथे गेल्यावर समजलेले सत्य ऐकून त्याच्या पायाखालची जमिनच हादरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईतील करनकोविल येथे राहणाऱ्या मोहम्मद इदरीस तेनामापेट हा तरुण एका मेडिकल दुकानात काम करतो. 7 ऑक्टोबर रोजी त्याने त्याच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात दोन हजार जमा केले होते. त्यानंतर इदरीसने बँक बॅलेन्स चेक करण्यासाठी गेले तेव्हा बँकेतून एक आलेला मेसेज पाहिला. त्यात म्हटलं होतं की, तुमच्या खात्यात 753 कोटी रुपये जमा झाले आहे. इदरीसने लगेचच बँकेच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली. 


खात्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याचे पाहताच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच ईदरीसचे बँक खाते फ्रीज केले गेले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक कारणामुळं चुकीच्या खात्यात रक्कम जमा झाली होती. त्यामुळं बँकेचे खाते फ्रीज करण्यात आले आहे. 


ईदरीसने म्हटलं आहे की, खात्यात 753 कोटी जमा झाल्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेच स्पष्टीकरण देण्यात आले नाहीये. तर, कोटक महिंद्राच्या बँकेच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार एसएमएस मॅसेजिंगमध्ये तांत्रिक कारणामुळं गडबड झाली होती. फक्त एसएमएसमध्येच चुकीची रक्कम दिसत आहे, बँक खात्यात नाही. ग्राहकाचे खाते बंद करण्यात आले नाहीये, आमची चूक सुधारण्याचे काम आम्ही करत आहोत. 


दरम्यान, तामिळनाडूमधील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी चेन्नई येथील एक कॅब ड्रायव्हर राजकुमारसोबतही असाच एक प्रकार घडला आहे. तामिळनाडू मर्केटाइल बँक (TMB) खात्यात 90000 कोटी जमा झाले होते. जेव्हा राजकुमारने याबाबत बँकेसोबत संपर्क साधला तेव्हा टीएमबी बँकेने लगेचच कारवाई करत पैसे परत घेतले. अशाच प्रकारची घटना तंजावुरच्या गणेशनसोबतदेखील घडली होती. त्यांच्या बँक खात्यात अचानक 756 कोटी रुपये जमा झाले होते.