नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) कोणत्याही व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आणखी एका पद्धतीची घोषणा केली आहेत. फोटोद्वारे तुमचा चेहरा जुळविण्यासाठी सुविधा सुरु करण्याची घोषणा केली आहे. या सुविधेचा वापर पहिल्यांदा दूरसंचार कंपन्यांसोबत करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबरपासून ही सुविधा सुरु होणार आहे. मात्र, यूआयडीएआयने होईल. प्राधिकरणाने आधी ओळख पटविण्यासाठी एक जुलैपासून अंमलबजावणी करण्याचे आखले होते. मात्र, यात बदल करुन ही योजना १ ऑगस्टपासून येणार आहे. 


दूरसंचार कंपन्यांवर फौजदारी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल सिमसाठी या नव्या सुविधेचा वापर करण्यात येणार आहे. या सुविधेच्यामाध्यमातून मोबाइल सिमसाठी अर्ज लावलेल्या फोटोंची ओळख त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरुन केली जाईल. यूआयडीएआयने सप्टेबरपासून ही सुविधा सुरु न केल्याने दूरसंचार कंपन्यांवर दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार केलाय. यूआयडीएआयने दूरसंचार कंपन्यांबरोबर अन्य एजेंसियांच्यामाध्यमातूनही चेहऱ्याचा प्रस्ताव असणार आहे. यासाठी कोणतीही अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. 


फिंगर प्रिंटपासून होणारी गडबड रोखणार


 यूआयडीएने म्हटले आहे की 'लाइव्ह फेस फोटो' आणि ईकेवाईसी दरम्यान काढलेले छायाचित्र यांच्यात मिळता-जुळता चेहरा झाला पाहिजे. सिम देताना याचा वापर करण्यात येणार आहे. अर्जावरील फोटो आणि चेहरा मिळताजुळता झाला पाहिजे. बोटांच्या ठशांची गडबडी किंवा गैरव्यवहार रोखण्यासाठी ही नवी योजना आमलात येत आहे. जेणेकरुन आधार कार्डला अधिक मजबुती येईल.


१५ सप्टेंबरपासून ही नवी सुविधा सुरु होणार


यूआयडीएआईच्या एका पत्रानुसार १५ सप्टेंबरपासून दूरसंचार कंपन्यांना कमीतकमी १० टक्के सत्यापन चेहरे थेट (थेट) फोटेशी जुळणी करणे आवश्यक आहे. जर यात दोष आढळला तर संबंधित कंपनीला २० पैसेचा दंड आकारण्यात येईल. या वर्षी जूनमध्ये हैदराबादमध्ये एक मोबाईल सिम कार्ड वितरकाने आधारच्या माध्यमातून गैरव्यवहार केला आणि हजारो सिम अॅक्टीव्ह केली होती. यूआयडीएआयचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले, लाईव्ह फेस फोटोला ईकेवायसीचा फोटो मिळता झाला पाहिजे. ज्यावेळी सिम देताना ते पाहिले पाहिजे. जर तुम्ही आधार शिवाय सिम देत असाल तर या आदेश लागू नसेल.