Marriage Story : देशात लग्नाचा माहोल सुरु आहे.जागोजागी लग्नाचे ढोल ताशे वाजतायत, वराती निघतायत. सोशल मीडियावर देखील लग्नाची धुम सुरू आहे. कारण लग्नाचे व वरातीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. अशाच एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली आहे. या लग्नात एका फिलीपिन्सच्या तरूणीने (Philippines Girl) भारतीय तरूणासोबत लग्नगाठ बांधलीय. या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  


कतारमध्ये झाली भेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या भावेश गायकवाडची (Indian Boy) 5 वर्षांपूर्वी कतारमध्ये जिजेल या तरुणीशी ओळख झाली. दोघेही तुर्कीच्या व्यापारी जहाजावर एकत्र प्रशिक्षण घेत होते. जिथे त्यांनी 9 महिने प्रशिक्षण घेतले. यानंतर भावेशला कतारमध्ये कॅप्टनची नोकरी मिळाली. यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.आणि या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. प्रेमानंतर दोघांनीही लग्न करण्यासाठी आपआपल्या कुटुंबियांची संमती मागितली. दोन्ही कुटूंबियांनी होकार दिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 



हिंदू रितीरिवाजानूसार लग्न


फिलीपिन्समध्ये (Philippines) लग्नाच्या या प्रकाराला मान्यता नव्हती. त्यामुळे दोघांनी भारतात हिंदू रितीरिवाजानूसार (Hindu Ritual marriage) लग्न करण्याचा निर्णय घेतला. जिजेल लग्नासाठी नातेवाईकांसह फिलीपिन्सहून भारतात आली. यावेळी छत्तीसगडच्या राजनादगावच्या ममता नगरमध्ये त्या दोघांनी हिंदू रितीरिवाजानूसार लग्न केले. जिजेलने लग्नाचे सर्व विधी हिंदू रितीरिवाजांनुसार पार पाडले, त्यात हळद, मेहंदी आणि पेरा यांचा समावेश आहे.


लग्नावर भावेश काय म्हणाला? 


आम्ही दोघे एकाच जहाजात क्रू मेंबर म्हणून काम करत होतो. आम्ही एक दुसऱ्याला खुप पसंत करायचो. फिलीपिन्समध्ये (Hindu Ritual marriage)लव्ह मॅरीजला परवानगी नसल्याने आम्ही येथेच लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नामुळे कुटुंब खूप आनंदी असल्याचे भावेशने सांगितले. 



भावेशला 5 वर्षांपूर्वी मर्चंट नेव्हीमध्ये भेटले होते. मला भावेश खुप आवडला होता. भारतातील (Hindu Ritual marriage) लग्नाची संस्कृती आणि प्रथा पूर्णपणे नवीन होत्या. भारतातील पाणीपुरी, मोमोज, पावभाजी खूप आवडली. हे सगळेच चटपटीत होते.तिच्या फिलीपिन्समध्ये असे मसालेदार पदार्थ खाल्ले जात नाहीत,असे जिजेल हीने सांगितले आहे. 


छत्तीसगढमध्ये ही घटना घडली आहे. भावेश आणि जिजेलच्या या अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर (Social media)चर्चा रंगली आहे.