मुंबई : सचिन वाजे (Sachin vaze) प्रकरणानंतर मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर सचिन वाजे प्रकरण आणि परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या आरोपावरुन भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारला घेरले. खंडणी गोळा करण्यात येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच पोलीस बदल्यांचे राजकारण  (police officer transfer racket) आणि फोट टॅपिंगबाबत आपल्याकडे पुरावे आहेत, असे पत्रकार परिषदेत जाहीर केले. याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली. 'फडणवीस यांच्याकडे कोणतेही पुरावे नसून तो निव्वळ लवंगी फटाका आहे', असा टोला संजय राऊत यांनी नवी दिल्लीत बोलताना लगावला आहे. (Phone tapping : Sanjay Raut slammed Devendra Fadnavis)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पोलीस दलातील बदल्यांबद्दल (police officer transfer racket) महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aaghadi Goverment) गंभीर आरोप केला आहे. याला राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे. राज्यातील लोकांनी केंद्रात आले पाहिजे. त्यांचा प्रभाव दिसला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंगचे आरोप केले होते. त्यांनी केंद्रीय गृह सचिव यांची भेट घेतली असल्याचे कळलते. त्यांच्याकडे देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये काडीचाही दम नाही. त्यात सरकारच्या कामाचे चुकीच असे काही नाही, त्यांमुळे त्यांचे आरोप निराधार आहेत, असे राऊत म्हणाले.



फडणवीस यांनी आणलेला कागदी 'बॉम्ब' हा 'लवंगी फटाका' निघाला आहे. त्याला वात नाही. तो भिजलेला फुसका लवंगी आहे. त्यांनी जो काही कागद दिला आहे. त्यामध्ये सरकारने चुकीचे काम केले, असा कोणताच उल्लेख नाही. ती कागदपत्र त्यांनी जाहीर करावीत. मग समजेल नक्की काय आहे, असा टोला राऊत यांनी  यावेळी त्यांना लगावला.