लखनऊ : जिल्ह्यातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी ही प्रशासकीय अधिकाऱ्याच्या खांद्यावर असते. या अधिकाऱ्यांच्या दिमतीला शासकीय बंगला, नोकर चाकर, गाडी सर्व काही असतं. पण काही अधिकारी हे भुरळून जात नाहीत. काही मोजके अधिकारी हे नेहमीच आपल्या वागणुकीतून विन्रमतेचं दर्शन घडवतात. असाच काहीसं एका प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत घडलं. एका प्रशासकीय अधिकाऱ्याचे भाजी विकतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. क्लास वन अधिकाऱ्याला भाजी विकताना पाहून अनेकांना धक्का बसला. तसेच अधिकाऱ्यावर ही वेळ का ओढावली, असा प्रश्नही अनेकांना पडला. नक्की काय आहे हा प्रकार, जाणून घेऊयात. (Photo of IAS officer Akhilesh Mishra selling vegetables goes viral on social media)
 
आयएएस अखिलेश मिश्र यांचा भाजी विकतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोत अनेक भाज्या दिसत आहेत. व्हायरल होणाऱ्या एका फोटोत हा अधिकारी ग्राहकांना भाजी दाखवताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत या अधिकाऱ्याची बुटंही दिसून येत आहेत. हे फोटो त्या अधिकाऱ्याने स्वत: फेसबूकवर शेअर केले. फोटो शेअर करताच नेटीझन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला. मात्र फोटो व्हायरल होतायेत, हे लक्षात येताच या अधिकाऱ्याने हे फोटो डिलीट केले. मात्र तोवर हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल फोटोमागील सत्य काय? 


"फोटो व्हायरल होतायेत, हे लक्षात येताच अखिलेश मिश्र यांनी फेसबूक पोस्ट करत फोटोमागील खरी कहाणी सांगितली. मी शासकीय कामाने प्रयागराजला गेलो होतो. तिथून परतताना मी भाज्या पाहण्यासाठी थांबलो. तिथे एका वृद्ध महिलेचंही भाजीपाल्याचं दुकानं होतं. त्यांचा लहान मुलगा कुठे तरी निघून गेला होता. त्यामुळे त्यांनी मला तिथे काही वेळ थांबण्याची विनंती केली. मी विनंतीला मान देऊन थांबलो. त्यानंतर त्या मुलाला शोधायला गेल्या. तेवढाच वेळ मी तिथे भाजीच्या दुकानावर उभा राहिलो. त्या दरम्यान काही ग्राहक भाजी घेण्यासाठी तिथे आले. यावेळेस माझ्या मित्राने माझ्या नकळत फोटो काढले. त्यानंतर माझ्याच मोबाईलवरुन ते फोटो शेअर केले. जेव्हा ही बाब माझ्या लक्षात आली, तेव्हा मी हे फोटो डिलीट केले", असं अखिलेश मिश्रा यांनी स्पष्ट केलं.