Girl Death After Eating Meat: वेळ कोणावर कशी येईल सांगता येत नाही. लहान मुलांच्या बाबतीत आपण खूप काळजी घेतो पण नियतीच्या पुढे आपण काही करु शकत नाही हेच खरे असते. . सुफरान मन्सूरी यांच्या परिवाराला याची प्रचिती आली. सुफरान यांना एक मुलगी होती. घरी सर्वकाही छान सुरु होतं. त्यात त्यांनी नववर्षाचं सेलिब्रेशन करुन आनंद साजरा करण्याचं ठरवलं. पण एका धक्कादायक घटनेने त्यांच्या नववर्षाची सुरुवात अत्यंत वाईट झाली.


घरी पार्टीचे आयोजन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरातील एका पार्टीदरम्यान चिमुरडीचा अंत झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मन्सूरी कुटुंबाने घरी पार्टीचे आयोजन केले होते. पण पुढे विचित्र प्रकार घडेल असं त्यांच्या मनीध्यानीही नव्हतं. पार्टी सुरु असताना घशात मांसाचा तुकडा घशात अडकल्याने तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. 


मुलीला त्रास होऊ लागल्याने नातेवाइकांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र यादरम्यान तिच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यानंतर उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला. 


मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील बेतिया येथील इनरवा गावात ही घटना घडली. सुफरान मन्सूरी आपल्या कुटुंबासह येथे राहतात. नववर्षानिमित्त त्यांनी घरी मांसाहार पार्टी ठेवली होती. काही शेजारीही यात सहभागी झाले होते. यावेळी सर्वजण मांसाहर करत होते. 


उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू 


दरम्यान, रोशनी खातून या तीन वर्षांच्या चिमुरडीच्या घशात मांसाचा तुकडा अडकला. मुलीला त्रास होत असल्याचे पाहून घरच्यांनी तिला पाणी प्यायला लावले. मात्र यामुळे रोशनीला आराम वाटला नाही. थोड्या वेळाने मुलीच्या तोंडातून रक्त येऊ लागले. हे पाहून कुटुंबीयांची धास्ती आणखीनच वाढली. त्यांनी मुलीला रुग्णालयात नेले. जिथे उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला. 


मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर आक्रोश करण्याची वेळ


तीन वर्षाच्या निष्पाप चिमुरडीचा मृत्यू झाल्याने घरात शोककळा पसरली आहे. वडील सुफरान मन्सुरी आणि आई शकिला खातून यांची रडून अवस्था खराब झाली आहे. मोठ्या उत्साहाने खात असलेल्या मासांच्या तुकड्याने तिचा जीव घेतला यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.