नवी दिल्ली : एअर इंडियाच्या वैमानिकाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं समजताच विमानाला अर्ध्या रस्त्यातून माघारी बोलावण्यात आले.  वंदे भारत मिशनअंतर्गत दिल्लीहून मॉस्कोला निघालेलं ए-३२० विमानाला उझबेकिस्तानवरुन माघारी बोलवण्यात आले.  शनिवारी सकाळी या विमानाने रशियाच्या मॉस्को शहरात जाण्यासाठी दिल्ली विमानतळावरुन उड्डण केले होते. उड्डाणापुर्वी सर्व क्रु मेंबर्सचे रिपोर्ट तपासले जातात. त्यामध्ये वैमानिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पण फक्त एका नजरचुकीमुळे निगेटिव्ह समजून कॅप्टनला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण  नंतर ही चूक लक्षात येताच उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलं विमान माघरी बोलावण्यात आलं आहे. सध्या विमानातील सर्व क्रु मेंबर्सना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या विमानाचे आता निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. शिवाय एअर इंडियाकडून आजच दुसरे एअसबस ए ३२० विमान मॉस्कोला पाठवण्यात येईल.


सुदैवाने विमानात प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठे संकट टळले आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर दोन तासांमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली. मॉस्कोमध्ये अडकलेल्या भारतीयांना या विमानातून परत आणलं जाणार आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत काम करणाऱ्या प्रत्येत क्रू मेंबरची कोरोना चाचणी करणं सरकारने बंधनकारक कलं आहे.