मुंबई: 'सेक्रेड गेम्स' ही वेब सीरिज सध्या चांगलीच गाजतेय. मात्र, ही वेब सीरिज आता वादाच्या भोवऱ्यात सापडलीये. भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान करण्यात आल्याप्रकरणी अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकी आणि निर्मात्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. याप्रकरणी १६ जुलैला सुनावणी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाजुद्धीन सिद्दिकी आणि सैफ अली खानची मुख्य भूमिका असणारी 'सेक्रेड गेम्स' ही बहुचर्चित वेब सीरीज वादात सापडलीये.  या वेब सीरीजमध्ये भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान करण्यात आल्याप्रकरणी अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकी आणि निर्मात्यांविरोधात काँग्रेसचे समर्थक राजीव सिन्हा यांनी  तक्रार दाखल केली आहे.  त्यांनी म्हटले आहे की, या वेबसीरीजमधील काही दृश्ये आणि संवाद आक्षेपार्ह असून यामुळे दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी यांची बदनामी होतेय.


दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. 'सेक्रेड गेम्स' ही वेबसीरिज सध्या चांगलीच गाजतेय. अशात या सीरिजच्या निर्मात्यांवर आणि अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकीवर तक्रार दाखल झाल्याने ही सीरिज अडचणीत सापडली आहे.