खुशखबर! निवृत्तीचे वय आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता; निर्णय सरकारच्या विचाराधीन
केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना लवकरच खूशखबर देण्याचा विचारात आहे. कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आणि पेंशनची रक्कम वाढवण्यावर विचार करीत आहेत
मुंबई : केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना लवकरच खूशखबर देण्याचा विचारात आहे. कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आणि पेंशनची रक्कम वाढवण्यावर विचार करीत आहेत. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीतर्फे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामध्ये देशातील लोकांचे काम करण्यासाठी वयोमर्यादा वाढवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. देशात निवृत्तीचे वय वाढवण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करावी. असाही प्रस्ताव समितीने ठेवला आहे.
जेष्ठ नागरिकांची सुरक्षा
समितीच्या रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना दर महिन्याला कमीत कमी 2000 रुपये पेंशन देण्यात यावे. तसेच जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी चांगली व्यवस्था करण्याची शिफारस केली आहे.
स्किल डेव्हलपमेंट गरजेची
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जर काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढवायची आहे. तर सेवानिवृत्तीचे वय वाढवणे गरजेचे आहे.
सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी हा निर्णय उपयोगी ठरू शकतो. अहवालात 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींच्या कौशल्य विकासाबाबतही सांगण्यात आले आहे.
सरकारे धोरण ठरवतात
केंद्र आणि राज्य सरकारने अशी धोरणे बनवावीत जेणेकरून कौशल्य विकास करता येईल, असे या अहवालात म्हटले आहे. या प्रयत्नात असंघटित क्षेत्रात राहणारे, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, स्थलांतरित ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नाही अशांचाही समावेश व्हायला हवा, पण त्यांना कौशल्यआधारीत प्रशिक्षण दिले पाहिजे.