मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पुढील रक्कम सोमवारी 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाहिर करणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलेल्या माहितीनुसार, 975 करोडहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 19500 करोड रुपयांहून अधिक रक्कम अकाऊंटमध्ये पाठवण्यात येणार आहे. या दरम्यान पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या खात्यात 6000 रुपये प्रती वर्ष दिले जातात. 2000 रुपये तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पाठवण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत जवळपास 1.38 लाख रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पाठवण्यात आले आहेत. 



शेतकऱ्यांचं नाव शोधण्याचा असा करा प्रयत्न 


सर्वात प्रथम पीएम किसान योजना अधिकृत वेबसाइटवर जा 
https://pmkisan.gov.in 
होमपेजवर Farmers Corner ऑप्शन असेल 
Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List वरील ऑप्शनवर क्लिक करा 
ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव सिलेक्ट करा
यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करा 
यानंतर लाभार्थींची संपूर्ण यादी समोर येईल. ज्यामध्ये तुम्ही तुमचं नाव शोधू शकता.