मुंबई : PM Kisan Samman Nidhi Yojana: होळीनंतर देशातील सुमारे 11 कोटी 74 लाख शेतकर्‍यांना चांगली बातमी मिळणार आहे. जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल. तर, लवकरच 2000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात येईल. होळीनंतर केंद्र सरकार पीएम किसानचा 8वा हप्ता जाहीर करणार आहे. एप्रिल महिन्यात कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. जर पुढच्या काही दिवसांमध्ये Rft Signed by State असे तुमच्या खात्यात लिहिले असेल, तर याचा अर्थ असा आहे की, लवकरच आपल्या खात्यात पैसे येणार आहेत. जर हा संदेश लिहिला नसेल तर तुमचा हफ्ता येणे अवघड आहे.


एक साथ मिळू शकतात 4 हजार रुपये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी करता आलेली नाही, त्यांनी जर 31 मार्चपूर्वी अर्ज केला असेल आणि त्यांचा अर्ज स्वीकारला गेला असल्यास मार्च महिन्यात तुम्हाला 2000 रुपयांचा हप्ता मिळेल. तसेच एप्रिल महिन्यातही तुम्हाला 2000 रुपयांचा लाभ मिळेल. म्हणजेच शेतकऱ्यांना 4000 रुपये एकत्र मिळतील.


केंद्र सरकार या योजनेअंतर्गत वर्षातून तीनदा 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणार आहे. जर एखाद्या नवीन शेतकर्‍यास त्यात सामील व्हायचे असेल आणि त्यांनी त्यासाठी अर्ज केला तर, सरकार त्याला सलग दोन हप्ते देऊ शकते.


आधारकार्ड बॅंकेशी ऑनलाईन कसं करावे लिंक?


आधार कार्ड तुम्ही बॅकेतून किंवा ऑनलाईन ही खात्याशी जोडू शकता. आधार बँक खात्याशी जोडण्यासाठी ज्या बँकेत आपले खाते आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. जर तुमची नेट बँकिंग सुरु असेल तर तुमच्या नेट बँकिंगमध्ये लॉग इन करा. यानंतर, माहिती आणि सेवा पर्यायावर जा (Information and service). त्यामध्ये तुम्हाला आधार नंबर अपडेट करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. जोडणी करताना, 12 अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक टाइप करा आणि सबमिट करा. जेव्हा आपला आधार आपल्या बँक नंबरशी जोडला जाईल, तेव्हा मोबाईल नंबरवर संदेश (Message) पाठविला जाईल.


याप्रकारे लिस्टमध्ये चेक करा नाव


https://pmkisan.gov.in/ या पोर्टलवर लॉगिन करा, Payment Success च्या टॅब खाली भारताचा नकाशा दिसेल, त्यावर क्लिक केल्यास एक नवीन पेज ओपन होईल. तिथे विलेज डॅशबोर्ड (Village Dashboard) पेज असेल, त्यामध्ये तुम्ही तुमच्या गावाचा संपूर्ण तपशील घेऊ शकता.


पहिले राज्य सिलेक्ट करा, नंतर आपला जिल्हा, तहसील निवडा. त्यानंतर शो बटणावर क्लिक करा. त्यानंतर, आपल्याला ज्या गोष्टी बद्दल जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा, संपूर्ण तपशील आपल्या समोर असेल. विलेज डॅशबोर्डच्या (Village Dashboard) खाली चार बटणे सापडतील, एकूण किती शेतकर्‍यांचा डेटा पोहोचला आहे हे आपणास जाणून घ्यायचे असल्यास डेटा रिसीव्हड वर क्लिक करा. अन्य गोष्टी माहित करुन घेण्यासाठी दुसर्‍या बटणांवर क्लिक करा.


तुमच्या आधारमध्ये असलेली गडबड तुम्ही 31 मार्चपर्यंत सुधारु शकता अन्यथा तुमचा 8वा हप्ताही थांबवला जाईल. तुम्ही आधार कार्डमधील बदल ऑनलाइन देखील करु शकता. बदल झाल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या आधार कार्डची xerox कॉपी घेऊन त्यांच्या बँक शाखेत जावे लागेल. शेतकऱ्यांनी त्याच बँकेत शाखेत ज्यायचे आहे. ज्या बॅंकेतील त्यांचे खाते या योजनेमध्ये दिलेले आहे. तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचा नवीन आधार जोडायचा आहे, असे तुम्ही बॅंक अधिकाऱ्याला सांगा. नंतर कर्मचारी त्यांचे खाते आधारशी जोडेल. तुम्हाला यासाठी शुल्क आकारले जाणार नाही.


या गोष्टीची काळजी घ्या


तुम्ही जर जम्मू-काश्मीर(Jammu and Kashmir), लडाख (Ladakh), मेघालय (Meghalaya) आणि आसाम (Assam) चे शेतकरी आहात आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) च्या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर, तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. कारण सरकार या राज्यांतील शेतकऱ्यांची आधार पडताळणी (Aadhaar verification) करणार आहे. पडताळणी दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या आधारमध्ये अडचणीत किंवा त्रुटी सापडतील त्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 8वा हप्ता देण्यात येणार नाही. तसेच भविष्यात अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.