मुंबई : जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल आणि PM किसान स्किमसाठी नोंदणी केली असेल तर, तुम्हालाही 2000 रुपयांचा हफ्ता मिळत असेल.  सरकार सर्व लाभार्थीची यादी जारी करीत असते. त्यात ज्या शेतकऱ्यांचे नाव असेल त्यांना या हफ्त्याची रक्कम दिली जाते.


खात्यात लवकरच पैसे येणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएम किसान सन्मान निधी योजनेशी आतापर्यंत 11.74 कोटी शेतकरी जोडले गेले आहेत. यांना नियमित अंतराने योजनेचा हफ्ता मिळतो. तुम्हीही एप्रिल-जुलैच्या हफ्त्याची वाट पाहत असाल, तर 2 मे नंतर तुमच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे.


आपल्या खात्यावर आले का तपासा?


 सर्वात आधी पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईटला भेट द्या. (https://pmkisan.gov.in) तेथे फारर्मर्स कॉर्नर नावचा पर्या दिसेल. तेथील लाभार्थ्यांची यादी म्हणजेच Beneficiaries List या पर्यायावर क्लिक करा.  यादीत आपले राज्य जिल्हा तालुका गाव सिलेक्ट करा. Get Report वर क्लिक करा त्यानंतर लाभार्थीची पूर्ण यादी समोर असेल.