नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देश अडचणीत सापडला आहे. त्यातच शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान किसान योजनेचा आठवा हप्ता (PM Kisan Yojana 8th Installment) देशातील 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करणार आहेत. बऱ्याच दिवसांपासून आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना याचा फायदा होईल. देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी या योजनेंतर्गत केंद्र सरकार दर आर्थिक वर्षात सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN)च्या लाभार्थ्यांना 14 मे रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आठवा हप्ता जाहीर करणार असल्याची माहिती पीएमओच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे. तो देशातील एकूण 9.5 कोटी लाभार्थ्यांना एकूण 19,000 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली जाईल.


PM Kisan संकेतस्थळावर https://pmkisan.gov.in/ वर जा. यानंतर Farmers Corner' अंतर्गत 'Beneficiary Status'वर क्लिक करा. आता तुम्हाला आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला याचा लाभ मिळेल का याची माहिती मिळेल.