नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमातून देशावासियांना संबोधित करणार आहेत. 14 जून रोजी पंतप्रधनांनी देशातील जनतेकडून त्यांच्या 'मन की बात' या रेडिओ प्रोग्रामसाठी सूचनाही मागितल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी मोदींनी एक क्रमांकही दिला होता, ज्यावर लोक मेसेज रेकॉर्ड करु शकतील. त्याशिवाय त्यांनी लोकांना नमो ऍप, MyGov आणि इतर सरकारी फोरमवरही सूचना देण्याबाबत सांगितलं होतं.


जून महिन्यात  #MannKiBaat हा कार्यक्रम 28 जून रोजी प्रसारित होणार आहे. यासाठी दोन आठवडे असून काही सूचना असल्यास कळवाव्यात. या सूचनांद्वारे अधिकाधिक लोकांचे विचार समजू शकतील आणि फोनद्वारे त्यांच्याशी जोडता येऊ शकते, अशा आशयाची पोस्ट करत मोदींनी जनतेला आवाहन केलं होतं. 



याआधी मोदींनी 31 मे रोजी जनतेला संबोधित केलं होतं. त्यावेळी मोदींनी लोकांना कोरोनाविरोधात लढाई जिंकण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालन करणं, मास्क घालणं आणि वारंवार हात धुण्याचं आवाहन केलं होतं.