अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या 'रन फॉर युनिटी' पार पडणार आहे. त्यासाठी रंगारंग तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गुजरात दौऱ्यावर आहेत. सकाळी पावणे आठ च्या सुमाराला पंतप्रधान मोदी स्टेच्यू ऑफ़ यूनिटी इथे सरदार पटेल य़ांना पुष्पांजली अर्पण करतील. त्यानंतर एकता दिवस परेडला सुरुवात होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये या 'रन फॉर युनिटी'मध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं. 'रन फॉर युनिटी'नंतर पंतप्रधान पावणे दहाच्या सुमाराला शस्त्र आणि सेनेच्या एका प्रदर्शनाचं उद्घाटन करतील. 


सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलंय. त्यासाठी RUNFORUNITY.GOV.IN या वेब पोर्टलवर रन फॉर युनिटीच्या आयोजनासंदर्भात माहिती मिळणार आहे. 


'रन फॉर युनिटी'मध्ये सहभागी व्हा, फिट इंडियासह एक भारत श्रेष्ठ भारत बनवूया, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.