नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सतत वाढत आहे. केंद्र सरकार राज्य सरकारांसह कोरोनाविरूद्ध लढत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी निरनिराळ्या वर्ग आणि विभागातील लोकांशी सतत बोलत असतात. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी कुशीनगर जिल्ह्यातील 106 वर्षीय माजी आमदार नारायण यांच्याशी फोनवर चर्चा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यातील नौरंगिया विधानसभेचे माजी आमदार नारायण यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान, पंतप्रधान मोदींना त्यांची विचारपूस केली. माजी आमदार नारायण हे 106 वर्षांचे आहेत आणि ते नौरंगिया विधानसभेचे माजी आमदार आहेत. त्यांनी जनसंघाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.


त्यांच्याशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही 100 वर्षे पाहिली आहेत. या संकटाच्या वेळी मी आपले आशीर्वाद घ्यावेत असा विचार केला. त्याचवेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुमच्याकडून लोक जे काही शिकले त्यांनी देशासाठी काम केले पाहिजे, ही त्यांची इच्छा आहे. त्याच बरोबर माजी आमदार नारायण यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले आहे की, तुम्ही स्वस्थ राहा आणि देशाचे नेतृत्व करा.'



सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील माजी आमदार 99 वर्षीय रत्नाभाई थम्मर यांच्याशीही फोनवर चर्चा केली. कोरोनाविरूद्ध लढण्यात मदत केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. तसेच त्याची विचारपूस ही केली. आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी गुजरातचे माजी आमदार रतनभाई थम्मर यांनी मुख्यमंत्री मदत निधीला 51,000 दिले. रतन भाई थम्मर हे 1975-1980 दरम्यान आमदार होते.