मुंबई :  केंद्रीय गृह खात्याच्या आदेशानुसार सर्व मंत्र्यांना ३१ ऑगस्टपर्यंत आपली संपत्ती जाहीर करणं बंधनकारक होतं.त्यानुसार सर्व नेत्यांनी आपआपली संपत्ती जाहीर केली आहे. कोणत्या नेत्याची किती संपत्ती आहे हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीविषयीही सर्वांना उत्सुकता आहे. त्यांनीही आपली संपत्ती जाहीर केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीमध्ये गेल्या वर्षभरात १५ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.  पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर २०१४-१५ ला नरेंद्र मोदींनी आपली निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती १.४१ कोटी इतकी दाखवली होती. २०१६-१७ या आर्थिक वर्षातील पंतप्रधानांची संपत्ती २ कोटींपेक्षा जास्त आहे. पंतप्रधानांच्या गांधीनगरमधील घराच्या किंमतीत मात्र, कुठलीही वाढ झालेली नाही. त्याची किंमत त्यांनी १ करोड इतकी दाखवण्यात आलीय. पंतप्रधानांच्या स्थावर मालमत्तेत फारसी वाढ झाली नसली तरी त्यांच्याकडची रोकड तब्बल ६६ टक्क्यांनी वाढलीय. या माहितीमुळे पंतप्रधानांच्या संपत्तीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. 


पंतप्रधानांच्या संपत्तीची विभागणी 


गांधीनगरच्या स्टेट बँकेतील बचत खात्यात १ लाख ३३रुपये
स्टेट बँकेच्याच दुसऱ्या शाखेत ९०.२६ लाखांची मुदत ठेव
एलआयसी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमधून ५.७५ लाखांची बचत
१ लाख ४९ हजार ७०० रुपयांची रोखड
४५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ४ अंगठ्याही आहेत. बाजारभावानुसार त्याची किंमत १ लाख २८ हजार