नवी दिल्ली : रायगड जिल्ह्यातील (Raigad)महाड शहरात (Mahad)झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. पीएमओकडून (PMO)ट्विट करुन दुर्घटनेत जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाडमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी अतिशय दु:ख आहे. स्थानिक अधिकारी आणि एनडीआरएफच्या पथकाकडून या दुर्घटनेठिकाणी बचावकार्य सुरु आहे. यासाठी सर्व शक्य ती मदत केली जाणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.



राजगड जिल्ह्यातील महाडमध्ये सोमवारी 5 मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेप्रकरणी इमारतीच्या फारुक काझी आणि युनूस शेख या दोन्ही बिल्डरच्या नावे सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखालून जवळपास ६० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. तर अद्यापही 18 जण जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  यात 8 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.  


घटनास्थळी असणारा ढिगारा उचलण्यासाठी सहा ते सात जेसीबी दाखल झाल्या आहेत. शिवाय एनडीआरएफच्या तीन टीमही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. प्रशासन आणि सर्व यंत्रणांकरुन घटनास्थळी वेगात बचावकार्य सुरु आहे.