दावोस मधल्या भाषणात मोदींकडून घडली मोठी नजरचूक
भाषण देताना मोदींनी काही चुकीचे संदर्भ दिले. विरोधकांनी हाच धाका पकडत टीकाही केली. पण, केवळ नजरचुकीने त्यांच्याकडून असे संदर्भ गेला असण्याचे त्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे.
मुंबई : आपल्या भाषणातून उपस्थितांच्या काळजाला हात घालत जनतेची नाडी पकडण्यात पंतप्रधान मोदींचा हातखंडा. त्यात त्यांच्या भाषणाचीही शैली निराळी. शाब्दीक फुलोऱ्यांपासून ते थेट लक्षवेधी भावमुद्रेपर्यंत त्यांचे सगळेच कसे वेगळे. त्यामुळे उपस्थित समुदाय मंत्रमुग्ध नाही झाला तरच नवल. याचेच दर्शन दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये झाले. या फोरममधले त्यांचे भाषण भलतेच रंगले खरे. पण, भाषण देताना त्यांनी काही चुकीचे संदर्भ दिले. विरोधकांनी हाच धाका पकडत टीकाही केली. पण, केवळ नजरचुकीने त्यांच्याकडून असे संदर्भ गेला असण्याचे समर्थकांनी म्हटले आहे.
मोदींच्या भाषणातील चुकीचे संदर्भ
पंतप्रधान मोदींनी भारतीय मतदारांची संख्या चुकीच सांगितली. भारतात एकूण ६०० कोटी मतदार असल्याचे ते म्हणाले. २१४मध्ये ६०० कोटी जनतेने ३० वर्षानंतर पहिल्यांदा एका राजकीय पक्षाला सरकार बनविण्यासाठी पूर्ण बहुमत दिले, असे मोदी म्हणाले. (भारताची लोकसंख्या साधारण १३० कोटी आहे. तर, मतदारांची संख्या ८० कोटींच्या असपा)
भाषणाच्या ओघात मोदींनी जगालाच संपविण्याची भाषा केली. (मोदींना येथे जगातील भेदभावाची दरी संपवणे असे म्हणायचे होते. मात्र, त्यांनी दुनिया असा शब्द वापरला.)
मोदींनी स्वातंत्र्याचा उल्लेख करत भारताला स्वतंत्र्य मिळून १७ वर्षे झाल्याचे सांगितले.( वास्तवात त्यांना ७० वर्षे असे म्हणायचे होते.