भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. प्रचारासाठी काँग्रेसप्रमाणेच भाजपनंही माळावा प्रांताचीच निवड केली. माळावा विभागातील राजगड जिल्ह्यातील मोहनपुरा धरणाच्या लोकपर्णाचा कार्यक्रम निवडण्यात आला. एकेकाळी राजगड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहांचा मतदासंघ होता. याच मतदारसंघात प्रचाराची सुरूवात करून राजकीय घाव घालण्याचाही भाजपचा प्रयत्न होता.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहनपुरा धरणाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकपर्ण करण्यात आलं. याच सभेत कामांचा पाढा वाचून शिवराज सिंहांची भलावण करण्याचा प्रयत्न मोदींनी केला.  मोहनपुरा धरणामुळे ७२४ गावातील सव्वा लाख हेक्टरवर सूक्ष्म सिंचन शक्य होणार आहे. ४०० गावातील प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. धरणासाठी ४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून ४ वर्षात हे धरण पूर्ण करण्यात आलं आहे. मध्यप्रदेशात १० वर्षात साडे सात लाखां हेक्टरवरून  ४० लाख हेक्टरवर नेण्याचा दावा केलाय. पुढच्या काही वर्षात हे सिंचनक्षेत्र ८० लाख हेक्टरवर नेण्याचा संकल्प सोडला. 


मंदसौरमध्ये ६ जून राहुल गांधींनी काँग्रेसच्या प्रचाराचा नाराळ फोडला त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वाढत्या संख्येबद्दल सरकारवर टीका केली. शेती व्यवसाय तोट्यात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्री शिवराज सिंहांनी राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं. शेती धंदा किफायतशीर करण्यासाठी त्यांचं सरकार प्रयत्नांची शर्थ करत असल्याचा दावा शिवराज सिंहांनी यावेळी केलं.


शेतक-यांमध्ये राज्य सरकारची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रचाराच्या पहिल्या सभेसाठी माळवा प्रांतातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या राजगड जिल्ह्यातील कामाचं लोकापर्ण करुन काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय. आता याचा निवडणूकीच्या प्रत्यक्ष राजकारणात किती फायदा होतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.