नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरुन वर्षात दुसऱ्यांदा तिरंगा फडकवला आहे. पीएम मोदी यांनी 15 ऑगस्टनंतर आज दूसऱ्यांदा लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला. आजच्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आजाद हिंद सरकारची घोषणा केली होती. आज या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून पीएम मोदींनी आज लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरम्यान नेताजींचे नातू आणि पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष चंद्र कुमार बोस देखील उपस्थित होते. चंद्र कुमार बोस यांनी यावेळी म्हटलं की, भारतीय असल्य़ाने आज आपण हा दिवस साजरा केला पाहिजे. या दिवसाचा आपल्याला अभिमान पाहिजे. चंद्र कुमार यांनी पत्र लिहून याबाबत पीएम मोदींनी मागणी केली होती. 



या कार्यक्रमात इंडियन नॅशनल आर्मीचे सदस्य देखील असणार आहेत. लालती राम, जागीर सिंह, परमानंद, जग राम आणि राम गोपाल हे नेताजींसोबत असणारे व्यक्तींची उपस्थिती महत्त्वाची आहे. याशिवाय मेजर जनरल जीडी बक्षी देखील उपस्थित राहणार आहेत. भाजपचे बंगालमधील काही नेते देखील यावेळी उपस्थित राहाणार आहेत.


या कार्यक्रमाबद्दल बोलताना पीएम मोदींनी म्हटलं की, या कार्यक्रमावर देखील लोकं टीका करु शकतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, 21 ऑक्टोबर 2018 ला नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आजाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यामुळे लालकिल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.