पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा आज दिल्लीत समारोप होतो आहे.
नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा आज दिल्लीत समारोप होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी काय बोलणार याची उत्सुकता आहे. दुसऱ्या दिवशी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. यावेळी गडकरींनी सरकारच्या विकास कामांचा पाढा वाचला. यावेळी गडकरींनी विरोधकांवर निशाणा साधला. मोदी सरकारच्या विकासकामांमुळे विरोधकांचा बँड वाजल्याची टीका गडकरींनी यावेळी केली.
लाईव्ह टीव्ही : http://zeenews.india.com/marathi/live
पंतप्रधान मोदी यांचं भाषण :
- राष्ट्रीय परिषदेत शेतकरी, गरीब यांच्याबाबत अनेक प्रस्ताव ठेवण्यात आले.
- देश पुन्हा एकदा भाजपकडे आशेने पाहत आहे. केंद्रात आणि राज्यात आपल्या सरकारच्या कामामुळे विश्वास वाढला आहे.
- देशाला उंच शिखरावर नेण्यासाठी भाजपवर विश्वास वाढला आहे.
- सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही दाग लागलेला नाही. आधीच्या सरकारने देशाला अंधारात ढकलून दिलं. 2004 ते 2014 पर्यंत सरकारने भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात घालवले.
- सरदार वल्लभभाई पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते तर देशाची स्थिती आज वेगळी असती.
- 2000 नंतर अटलजी पंतप्रधान असते देश आज वेगळ्या ठिकाणी असता.
- देशातील लोकांचा आत्मविश्वास परत आणण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे.
- जेव्हा देशात काही कठोर निर्णय घेतले जातात तेव्हा लोकं साथ देतात.
- सबका साथ सबका विकास, एक भारत श्रेष्ठ भारत हे भाजपच्या कार्यकर्त्यांचं ध्येय आहे.
- भारताच्या प्रत्येक नागरिकांचा विकास फक्त सगळ्यांची साथ घेऊन होते हे आमचे संस्कार आहेत.
- सवर्णांना 10 टक्के आरक्षण हा भारताचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. हे फक्त आरक्षण नाही तर गरीबीमुळे संधी न मिळत असलेल्या तरुणांसाठी आशेचा किरण आहे.
- बाबासाहेबांनी दिलेले अधिकारी यापुढेही असेच राहतील. पण सामान्य वर्गाच्या गरीबांकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नव्हतं.
- काही लोकं या आरक्षणावरुन देशाच्या लोकांमध्ये संभ्रम पसरवत आहे.
- देशातील युवा आज जगातील मंचावर जे यशाचे झेंडे नेत आहेत ते न्यू इंडियाचं उदाहरण आहे.
- सकारात्मक विचारासह आज राष्ट्रभाव देखील जागृत होत आहे. देशात टॅलेंटची कमी नाही. आमच्या सरकारने वातारवण चांगलं बनवण्यासाठी प्रयत्न केला.
- सरकार आणखी नव्या योजनांवर काम करत आहे. महिलांसाठी सरकार काम करत आहे. महिला शक्तीचं रुप आहे. त्यामुळे पहिल्यांदाच लष्करात पहिल्यांदा महिलांचं सशक्तीकरण होत आहे. देशाच्या मुली फायटर प्लेन उडवत आहेत.
- सरकार इमानदारीने प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांसाठी देखील काम करत आहे. पण आधीची कारणं देखील लक्षात ठेवली पाहिजे. देशातील शेतकऱ्यांना तात्पुरती मदत दिली. निवडणुकीसाठी फक्त मदत दिली जात होती. पण शेतकऱ्यांच्या मुळ समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- आम्ही सरकारमध्ये येण्यापूर्वी डाळच्या दराबाबत देशात खळबळ होती. पण आम्ही सरकारमध्ये आल्यापासून नवीन निर्णय घेतले. आज डाळीचे भाव किती वाढले आहेत.
- भाजप सरकारने 4.5 वर्षात 95 लाख मॅट्रीक टन उत्पादन आम्ही शेतकऱ्यांकडून खरेदी केली. अजूनही खूप काही करणं बाकी आहे. शेतकऱ्यांपुढे मोठं आव्हान आहे. पण आमचे मोठे प्रयत्न देखील सुरु आहे.
- शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करतो आहे.
- विरोधक माझ्यावर फक्त योजनांचं नाव बदलल्याची टीका करतात. पण कोणत्या योजनांच्या नावामागे माझं नाव लावलं आहे.
- देशात सिलेंडर आधीपण मिळायचे, रस्ते पण बनायचे, पूल पण बनायचे, रेल्वे पटरी पण बनत होती. पण आमच्या सरकारमध्ये कामाला मिळालेली गती अभूतपूर्ण वाढली आहे.
- देशाला पुढे नेण्यासाठी व्यवस्थेमधील समस्या आमच्या सरकारने दूर केल्या. देशातील लोकांचं जीवन आणखी चांगलं बनावे. गरीबांना चांगलं जगता यावं यासाठी प्रयत्न करणार आहेत.
- गरीबांसाठी घर बनवण्याची योजना आधीपासून सुरु झाली असती तर आज प्रत्येकाकडे घर असतं. आज गावागावात आम्ही वीज पोहोचवण्याचं काम जलद गतीने करत आहे. शौचालय बनवण्याचं काम गावागावात गतीने सुरु आहे.
- आधीच्या सरकारच्या काळात सबसिडीचा पैसा चुकीच्या लोकांच्या हातात जात होता.
- मध्यम वर्गाच्य़ा लोकांचा बँकेत ठेवलेला पैसा काँग्रेसच्या तिजोरीत गेला. काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला.
- स्वातंत्र्यानंतर बँकांनी 18 लाख कोटींचं लोन दिलं होतं. पण 2006 नंतर 34 लाख कोटींनी हे लोन काँग्रेसच्या काळात वाढलं.
- काँग्रेस घोटाळ्याबाजांना लोन देण्यासाठी बँकांना मजबूर करत होती. एका फोनवर शेकडो कोटींचं लोन दिलं जात होतं.
- हॅलिकॉप्टरच नाही तर लढाऊ विमानांमध्ये देखील घोटाळा झाला होता. त्यामुळे काँग्रेसचे नेते आरडाओरड करत आहे.
- आधीच्या सरकारच्या काळात लढाऊ विमानांची डील यामुळे थांबली कारण त्यांना त्यांच्या कंपन्यांकडून हे विमान खरेदी करायचे होते. मला शिव्या दिल्या, काहीही बोलले तरी हा चौकीदार थांबणार नाही.
- चोर कुठेही असेल, विदेशात असेल तरी हा चौकीदार सोडणार नाही.
- आज महाआघाडीची चर्चा सुरु आहे. पण जे पक्ष काँग्रेसमधून वेगळे झाले. तेच आता त्यांच्या नेत्यांसमोर झुकत आहे. लोकांनी पर्याय म्हणून तुम्हाला मत दिलं. पण तुम्ही परत काँग्रेसपुढेच झुकत आहेत.
- कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात की त्यांना क्लर्क बनवून ठेवलं आहे. आता तर सुरुवात आहे. पुढे बघा काय होतं.
- हे सर्व विरोधक मिळून देशात मजबूर सरकार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे ते भ्रष्टाचार करु शकतील. पण देशाला मजबूत सरकार हवी आहे. कारण सबका साथ सबका विकास होऊ शकेल.
-