PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डंका जगभरात वाजतोय. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे पंतप्रधान मोदींच्या (PM Narenda Modi) नेतृत्वगुणांची तारीफ जगातल्या विविध देशांच्या प्रमुखांनी केलीय. विश्वगुरू म्हणून मोदींचं नेतृत्व जगाच्या पटलावर उदयाला आलंय. त्यांच्या प्रशंसकामध्ये आता नवी भर पडलीय ती नोबेल पुरस्कार समितीच्या (Nobel Peace Prize Commitee) सदस्यांची. सध्या नोबेल पुरस्कार समिती नॉर्वेहून (Norve) भारताच्या दौऱ्यावर आलीय. या समितीचे उप प्रमुख अॅशले तोजो (Asle Toje) यांनी मोदींची तोंड भरून स्तुती केलीय..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोबेल पुरस्कार समितीकडून कौतुक
रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रयत्न केले. मोदींनी रुसच्या राष्ट्राध्यक्षांची काढलेली समजूत कौतुकास्पद आहे असं अॅशले तोजो यांनी म्हटलं आहे. तसंच आण्विक युद्धाचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा संदेश मोदींनी जगाला दिला. जगाला अशा खंबीर नेतृत्वाची गरज आहे. विश्वात शांतता नांदावी यासाठी मोदी योगदान देत आहेत त्यामुळं ते नोबेल शांतता पुरस्काराचे दावेदार होऊ शकतात, असं तोजो म्हणालेत.


स्वत: तोजो हे पंतप्रधान मोदींचे चाहते असल्याचं त्यांनी म्हटलंय. मोदींनी राबवलेल्या धोरणांमुळे जगात भारत हा एक शक्तिशाली देश म्हणून नावारुपास येत आहे. भारत जगातील शांततेसाठी काम करत आहे, जगाने भारताकडून खूप काही शिकण्यासारखं असल्याचंही तोजो यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदींसारख्या शक्तिशाली नेत्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची क्षमता असल्याची स्तुती त्यानी केलीय.


तोजो यांनी भारत केवळ मैत्रीपूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडत असल्याचं म्हटलंय. भारताचे प्रतिनिधी कधीच मोठ्या आवाजात बोलत नाहीत, तसंच भारताने आतापर्यंत कोणालाही धमकावलं नाहीत, त्यामुळे आंतरराष्ट्रायी राजकारणात भारतासारख्या देशाची गरज असल्याचं तोजो यांनी सांगितलं.


रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात मोदींनी शांतीदूताची भूमिका पार पाडली. या युद्धात भारतानं तटस्थ भूमिके घेत दोन्ही देशांशी वाटाघाटी केल्या. मोदींच्या याच भूमिकेचं नोबेल पुरस्कार समितीनं कौतुक केलंय.. त्यामुळं लवकरच त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.