Lakshadweep vs Maldives Row: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका भेटीने लक्षद्वीप (Lakshadweep) दक्षिण आशियातील पर्यटनाच्या केंद्रस्थानी आलं आहे. 4 जानेवारीला पीएम मोदी (PM Narendra Modi) यांनी लक्षद्वीप यात्रेचे फोटो आपव्या ट्विटर हँडलवर शेअर केले. तोपर्यंत गूगलवर या केंद्रशासिस प्रदेशाबद्दल निवडक माहिती शोधली जात होती. पण पीएम मोदींचं ट्विट, मालदीवच्या (Maldives) मंत्र्यांची टीका आणि त्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या गदारोळानंतर लक्षद्वीपबद्दल लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2004 पासून आत्तापर्यंतची जी माहिती Google Trends वर उपलब्ध आहे. त्यानुसार लक्षद्वीपशी संबंधित सर्वाधिक शोध गेल्या चार दिवसांतच घेतला गेला आहे. भारताव्यतिरिक्त, कतार, यूएई, ओमान, सिंगापूर, पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, यूके यांसारख्या आखाती देशांतील युजर्सनेही गुगलवर लक्षद्वीपबद्दल सर्च केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्षद्वीपबद्दल लोकांची उत्सुकता आणि मालदीवचे रद्द होणारे दौरे पाहता या संपूर्ण वादाला आमंत्रण देऊन मालदीवने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. आता सर्वसामान्य भारतीयांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण मालदीव सोडून लक्षद्वीपला जाण्याचे नियोजन करत आहेत.


पीएम मोदींचं एक ट्विट
पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप भेटीचे फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केले. यात त्यांनी कुठेही मालदीवचा उल्लेख केला नव्हता. पण यानंतरही मालदीप सरकारमधले मंत्री मरियम शिऊना यांनी या फोटोंवर वादग्रसत टीका केली. त्यानंतर मालदीवमध्ये अँटी इंडिया आणि अँटई मोदी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या जाऊ लागल्या. हे कमी की काय मरियम शिऊना यांच्यानंतर मालशा शरीफ आणि महमूद माजिद या मालदीवच्या आणखी दोन मंत्र्यांनी पीएम मोदींच्या पोस्टवर टीका करणारी पोस्ट केली. पण याला भारतीयांनी चांगलंच प्रत्युत्तर दिल.


अनेक भारतीयांनी मालदीवचं बुकिंग रद्द केलं.  #BoycottMaldives ट्रेंडमध्ये आल्यानंतर मालदीव सरकारला जाग आली. मालदीव सरकारने एक निवेदन जारी करत मंत्र्याचं वैयक्तिक मत असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर पीएम मोदी आणि भारताविरोधी अपमानकारक पोस्ट करणाऱ्या तीनही मंत्र्याचं निलंबन करण्यात आलं. या मंत्र्यांचं X अकाटंही डिअॅक्टिव्ह करण्यात आलं. 


मालदीवला आर्थिक फटका
मालदीव पर्यटनाला अँटी इंडिया कॅम्पेनचा चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनेक लोकांनी मालदीवचं बुकिंग रद्द केलं आहे. त्याचबरोबर टॅव्हल कंपन्यांनाही मालदीपच्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. EasyMyTrip ने मालदीवच्या सर्व बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत आणि अनेक खेळाडूंनी लक्षद्वीप पर्यटनाला पाठिंबा दिला आहे. येत्या काळात लक्षद्वीप पर्यटनाला अच्छे दिन येणार आहेत. पर्यटन मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार लक्षद्वीपमध्ये आता काही हजार पर्यटक येत होते. पीएम मोदी यांच्या भेटीनंतर पर्यटकांची संख्या लाखात जाण्याचा अंदाज आहे.