वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौ-याचा दुसरा दिवस आहे. आपल्या मतदारसंघातील शहंशाहपूर इथं मोदींनी स्वच्छता अभियानाला सुरुवात केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गावात शौचालय उभारण्यासाठी स्वतः मोदींनी श्रमदान केलं. यावेळी मोदींनी इथल्या ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर मोदींनी पशू आरोग्य मेळ्याला उपस्थिती लावली. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात मोदींनी पशुधन मेळावा आयोजित केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. 


तसंच भाजपसाठी पक्षापेक्षा देशहित आणि विकास महत्त्वाचं असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. शिवाय स्वच्छता राखणं ही सगळ्याची जबाबदारी असल्याचेही मोदी म्हणालेत. थोड्याच वेळात पंतप्रधान एका गोशाळेला भेट देणार आहेत. ही गोशाळा ६७ वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातं. या ठिकाणी जाऊन पंतप्रधान इथल्या विविध पाच जातीच्या गायींची पूजा करणार आहे.