नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ च्या निवडणुकांची तारीख अजून जाहीर झाली नसली तरी राजकीय पक्षामध्ये आतापासून आरोप प्रत्यारोप आणि टीका सुरु झाली आहे. राजकीय वातावरण आतापासूनच तापायला लागलं आहे. एकीकडे काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल डीलवरुन घेरण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजप देखील काँग्रेसच्या या आरोपांची खिल्ली उडवत आहे. आज पंतप्रधान मोदींनी हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये काँग्रेसवर जोरदार टीका केली.


महाघोटाळ्यातील लोकांना त्रास होतोय - मोदी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुरुक्षेत्रात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, जे लोकं गरीबांना लुटत होते. त्यांना सिस्टममधून बाजुला केलं आहे. आज जे ईमानदार आहेत त्यांना चौकीदारवर विश्वास आहे. जे लोकं भ्रष्ट आहेत त्यांना मोदीपासून त्रास होत आहे. महाघोटाळ्यात जितकी लोकं आहेत त्यांच्यात कोर्ट, सीबीआय आणि मोदीला शिव्या देण्याची स्पर्धा रंगली आहे.



'स्वच्छ भारत मिशनला मोठं यश'


पीएम नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, नायजेरिया येथून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो. मला आनंद आहे की तुम्ही येथे अभ्यास करण्यासाठी आले आहेत आणि तुम्ही स्वच्छ भारत मिशनची माहिती घेण्यासाठी आले आहेत. भारतात या मिशनचं यश कौतुकास्पद आहे.



स्वच्छता असली पाहिजे ओळख - पीएम मोदी


कुरुक्षेत्रात बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, युरोपमध्ये एक जागा आहे जेथे घराच्या बाहेरील भिंती सुंदर प्रकारे रंगवल्या गेल्या आहेत. ते पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून लोकं येतात. मला आशा आहे की, एक दिवस अशीच स्थिती भारतात दिसेल. पर्यटक अशी घरं पाहण्यासाठी भारतात येतील.