मुंबई : जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर लागू होण्यासाठी आता अवघे काही तास उरलेत... आणि नेमकं याच वेळेस काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून लोकांसमोर मांडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीएसटी कधीही यशस्वी होऊ शकणार नाही... असं या व्हिडिओत पंतप्रधान मोदी म्हणताना दिसत आहेत. 'जीएसटीबद्दल मोदीजी आणि भाजपचं हे खरं मत आहे' असं या व्हिडिओसोबत काँग्रेसनं म्हटलंय. 




'मोदीजी तुम्ही तुमचेच शब्द एवढ्या लवकर कसे विसरलात. योग्य पायाभूत सुविधा न निर्माण करता तुम्ही जीएसटी का लागू करत आहात' असं काँग्रेसनं आणखीन एक व्हिडिओ शेअर करत म्हटलंय. 


उल्लेखनीय म्हणजे, आज होणाऱ्या जीएसटी लॉन्चिंग सोहळ्यावर काँग्रेसनं बहिष्कार टाकलाय.