नवी दिल्ली : अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'बीएमडब्ल्यू सीरिज ७' ही गाडी तैनात असते परंतु, स्वातंत्र्यदिनी मात्र ते अचानक दुसऱ्याच एका गाडीतून उतरताना दिसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींचं वाहन बदललेलं पाहून अर्थातच अनेकांच्या नजरा तिकडे वळल्या... ही कार होती 'टाटा'चा एक भाग असणाऱ्या रेंज रोवर कंपनीची... '२०१० रेंज रोवर एचएसई' मॉडलची ही कार होती.


'२०१० रेंज रोवर एचएसई'मध्ये ५.० लीटरचं V8 इंजिन आहे. ० ते ६० माईल प्रति तासाचा स्पीड केवळ ७.२ सेकंदात घेते. ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम देण्यात आलंय. ही केवळ कार नाही तर काssssर आहे, अशी प्रतिक्रिया पाहणाऱ्यानं दिली नाही तरच नवल... 


'२०१० रेंज रोवर एचएसई'

सुरक्षेसाठी यामध्ये रडार बेस्ड अडाप्टिव्ह क्रूज कंट्रोल, ऑप्शनल सराऊंड कॅमेरा सिस्टम देण्यात आलाय. यामुळे ड्रायव्हरला वाहनाच्या चारही बाजुंनी ३६० डिग्री व्ह्यू दिसू शकतो. कारमध्ये एअरबॅग्ज, प्री टेंशनिंग सीटबेल्टस, साईड इम्पॅक्ट बीम्स असे अनेक फिचर्स आहेत. हार्ड ड्राइव बेस्ट १२ इंच टीएफटी टचस्क्रीन यात उपलब्ध आहे. पॉवर टिल्ट अॅन्ड स्लाइड सनरूफ, एलईडी इंटीरियर लायटिंग, ब्लूटूथ इंटिग्रेशन सारखे फिचर्सही यात देण्यात आलेत.  


'२०१० रेंज रोवर एचएसई' ही गाडी म्हणजे लग्जरी आणि ऑफ रोड कार स्टाईलचं मिश्रण आहे. ऑफ रोडमध्येही ही गाडी रफ अॅन्ड टफ मानली जाते. 


आता ही गाडी पंतप्रधान मोदी पुढेही वापरणार आहेत का? हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.