नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' या विशेष कार्यक्रमामधून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी ११ वाजता 'मन की बात' चा ४६ वा भाग प्रसारीत होईल. देशभरात ऑल इंडीया रेडीओ आणि दूरदर्शनवर या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे. देशातील ज्वलंत मुद्यांवर पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाष्य करतात. समाजात होणाऱ्या सकारात्मक कामांचं कौतुकही करतात.


मोदी तीन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय दौऱ्यासाठी लखनऊला आलेत. या दौऱ्यात त्यानी अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन ऑफ अर्बन ट्रान्सफॉर्मेशन आणि प्रधानमंत्री आवास योजनांचा शुभारंभ केला. दौऱ्यात जवळपास ६४ कोटी रुपयांच्या योजनाचं उद्घाटन केलं. राज्यपाल राम नाईक, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते. २०२२ पूर्वी प्रत्येकाला स्वताचं घर असावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरकारने शहरात ५४ लाख घरांना तर १ कोटींपेक्षा अधिक ग्रामीण भागातील जनतेच्या घरांसाठी मंजुरी दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.


मोदींकडून पुणे महापालिकेला सन्मान


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौमधील ट्रान्सफार्मिंग अर्बन लँडस्केप च्या कार्यक्रमात, पुणे महापालिकेचा अमृत योजनेतल्या विशेष सहभागाबद्दल सन्मान करण्यात आला. अमृत योजने अंतर्गत ४१२ शहरांमध्ये पुणे हैद्राबाद आणि इंदोर महापालिकेने शहर विकासासाठी कर्ज रोखे जारी करुन देशात हा बहुमान मिळवला आहे. पुणे महापालिकेच्या दोनशे कोटींच्या कर्जरोख्यांबद्दल पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.