नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या 1 दिवस आधी पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी झालेल्या महाहिंसक दंगलीत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे स्मरण केले. या दिवसाला विसरू शकत नाही. भारत या दिवसाला Partition Horrors Remembrance Day म्हणून स्मरण केला जाईल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Partition Horrors Remembrance Day
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले आहे की, देशाच्या फाळणीचे दुःख विसरता येऊ शकत नाही. तिरस्कार आणि हिंसेमुळे आपल्या लाखो बंधू-बहिणींना विस्तापित व्हावे लागले आहे. त्यांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाला आजच्या दिवशी स्मरण करायला हवे म्हणून आजचा दिवस Partition Horrors Remembrance Day म्हणून स्मरण केला जाईल.



मानवी संवेदना मजबूत करण्याचा दिवस
पंतप्रधानांनी अन्य एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, Partition Horrors Remembrance Day मुळे भेदभाव, वैमनस्य आणि तिरस्काराची भावना नष्ट करण्यात प्रेरणा देईल. तसेच देशात एकता, सामाजिक सद्भाव आणि मानवी संवेदना मजबूत होतील.