चंदीगढ: नरेंद्र मोदी हे भारताला आजवर लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान आहेत, अशी टीका पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केली. गेल्या पाच वर्षांत त्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण करण्यात आलेले एक आश्वासन सांगावे. त्यांनी केवळ जुमलेबाजी करून लोकांनी फसवले. यामुळे देशाची पत खालावली. ही गोष्ट लोकांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आता जनतेने त्यांना सत्तेवरून हटवण्याची तयारी सुरु केल्याचे अमरिंदर सिंग यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गरिबी हटाव' नंतर कर्जमाफी हा काँग्रेसचा नवा जुमला- मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच गुरुदासपूर येथे झालेल्या सभेत कर्जमाफी, शीखविरोधी दंगल आणि इतर मुद्द्यांवरुन काँग्रेसला लक्ष्य केले होते. देशातील इतर राज्यांप्रमाणे काँग्रेसने पंजाबमध्येही कर्जमाफीची घोषणा केली होती. पण दीड वर्षांनी काय परिस्थिती आहे सर्वांनाच माहिती आहे. काँग्रेसच्या काळात शेतकरी नसलेल्यांची कर्जे माफ करण्यात आली. काँग्रेसने अनेक वर्षे 'गरिबी हटाव'चा नारा देऊन देशातील जनतेची फसवणूक केली. यानंतर आता कर्जमाफी हा काँग्रेसचा नवा जुमला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.