नवी दिल्ली : अनेक खास कार्यक्रमांमध्ये आपल्या पोशाखामुळे चर्चेत असणारे मोदी यावेळेस देखील स्‍वातंत्र्य दिना दिवशी पुन्हा चर्चेत आहेत. मोदींचा कुर्ता अनेकांना आकर्षित तर करतोच पण पंतप्रधान मोदींचा फेटा देखील वेगवेगळा असतो. पंतप्रधान मोदींच्या यंदा चौथ्यांदा एका वेगळ्या प्रकारचा फेटा घातला होता. यावेळेस पंतप्रधान मोदींचा फेटा हा लांब होता. मागच्या बाजुला सोडण्यात येणारा फेटा हा त्यांच्या घुडघ्यापर्यंत होता. देशातील विविध भागामध्ये फेट्याला गरीबांच्या शानचं प्रतिक मानलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी यावेळेस पिवळा आणि नारंगी रंगाचा फेटा घातला होता. हा गुजराथी फेटा असल्याचं बोललं जातंय.



जोधपुरी फेटा


पंतप्रधान मोदींनी २०१६ मध्ये जोधपुरी फेटा घातला होता. त्यावेळेस त्यांनी साधा कुर्ता घातला होता. पण लाल, गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या जोधपुरी फेट्याने अनेकांचं मन जिंकलं होतं. हा जोधपूरचा प्रसिद्ध गजशाही फेटा आहे. हा फेटा स्वत: पंतप्रधान मोदींनी निवडला होता. एकूण ५ फेटे पंतप्रधानांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते त्यापैकी मोदींनी हा फेटा निवडला होता. 



जयपुरी फेटा


२०१५ मध्ये पंतप्रधान मोदींनी ८६ मिनिटांचं भाषण करत नवा रेकॉर्ड केला होता. त्यावेळेस पंतप्रधान मोदी त्यांच्या फेट्यामुळे देखील चर्चेत आले होते. हिरवा आणि लाल रंगाचा हा फेटा होता. त्यांची लांबी कमरेपर्यंत होती.



लहरिया फेटा


२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन पहिल्यांदा ध्वज फडकवला होता. तेव्हा मोदी पूर्णपणे तिरंगा रंगात दिसले होते. मोदींनी पांढरा कुर्ता-पायजामा आणि राजस्थानच्या बांधणी प्रिंटचा केसरी फेटा घातला होता. फेट्याची किनार हि हिरव्या रंगाची होती.