नवी दिल्ली : आपल्या वैज्ञानिकांनी अंतराळात ३०० किलीमीटर दूर लाईव्ह सेटेलाईटला (एलईओ उपग्रह) पाडलंय. ऍन्टी सॅटेलाईटद्वारे (ए-सॅट) पाडलं गेलंय. केवळ तीन मिनिटांत हे ऑपरेशन पूर्ण करण्यात आलंय. 'मिशन शक्ती' अत्यंत कठिण ऑपरेशन होतं. वैज्ञानिकांनी सर्व उद्देश प्राप्त केले आहेत. भारतीयांसाठी हा गौरवाचा क्षण आहे. भारताद्वारे विकसीत करण्यात आलेल्या ए-सॅट द्वारे या मोहिम पूर्ण करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

LIVE UPDATE :


- अंतराळात आता भारतही महाशक्ती बनला आहे - मोदी


- आम्ही या ऑपरेशनमधून कोणत्याही संधीचं उल्लंघन केलेलं नाही.- मोदी


- अँटी सॅटेलाईट निर्माण करणारा भारत चौथा देश बनला आहे - मोदी


- भारताने आपली क्षमता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे - मोदी


- अंतराळात ३०० किलोमीटर दूर असलेलं हे सॅटेलाईट भारताने पाडलं आहे. - मोदी


- भारताने लो अर्थ ऑर्बिटमध्ये लाईव्ह सॅटेलाईट पाडलं - मोदी


- वैज्ञानिकांची मिशन शक्ती ऑपरेशन पूर्ण केलं. - मोदी


- भारताने आज अंतरिक्ष क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. - मोदी


- पंतप्रधान मोदींकडून देशाला मोठी घोषणा ऐकायला मिळण्याची शक्यता - सूत्र


- सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदींनी कॅबिनेटची महत्त्वाची बैठक बोलावली होती. यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या मंत्र्यांना बोलवण्यात आलं होतं. सुरक्षा समितीचे सदस्य देखील यावेळी उपस्थित होते. त्यामुळे देशाच्या सुरक्षेसंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.


याआधी ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान मोदींनी अशाच प्रकारे देशाला संबोधित करत असताना नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याची मोठी घोषणा केली होती.


देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. आचार संहिता लागू झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी कोणाताही राजकीय किंवा धोरणात्मक निर्णय नाही घेऊ शकत. त्यामुळे ते काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागून आहे.



लाईव्ह टीव्ही