नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सध्या दुसरे सत्र सुरू आहे. मात्र, संसदेत सुरू असलेल्या गदारोळामुळे कामकाजच पुढे चालू शकले नाही. परिणामी ककमकाज अनेक वेळा स्थगित करावे लागले. दरम्यान, राज्यसभेच्या ४० खासदारांचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यामुळे ते निवृत्त होत आहेत. या खासदारांना सभागृहातून निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधीत केले. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, भले आपल्यासाठी सभागृहाचे दरवाजे बंद झाले असतील. पण, माझ्या कार्यालयाचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. आपण, केव्हाही माझ्या कार्यालायात येऊ शकता. आपले आनुभव, विचार यांचे आधानप्रधान करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, हे सभागृह अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी आणि कर्तव्यतत्पर व्यक्तींचे आहे. ज्यांच्यामुळे या सभागृहाचे कामकाज अधिक सक्षम पद्धतीने चालते. दरम्यान, सभागृहात होणाऱ्या गदारोळाबद्धल बोलताना मोदी म्हणाले, जर सभागृहाचे कामकाज चांगले चालले असते तर, निवृत्त होणाऱ्या सदस्यांना आणखी एक चांगले काम करून गेल्याचा अनुभव राहिला असता. या सदस्यांना तीन तलाखसारख्या अनेक चांगल्या विधेयकांवर विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही.


सभागृहाचे कामकाज चांगले चालू शकले नाही याबब मोदींनी विरोधी पक्षाला जबाबदार ठरवले. संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षाचे सदस्य संसदेतील गदारोळाला कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले.