मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावलीय. ७ महिन्यांनंतर ही केंद्रीय कॅबिनेटची बैठक होतेय. मोदी सरकारचा आता फक्त एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक आहे... त्यादृष्टीनं या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे. या बैठकीत आयुष्मान योजना, पीक विमा योजना, उज्जवला योजन, मुद्रा योजना आणि स्टार्टअप योजना या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं आणि प्रभावी अंमलबजावणी यावरही चर्चा होणार आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधानांनी या योजनांच्या लाभार्थ्यांशी अॅपच्या माध्यमातून संवाद साधला होता. देशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय.