श्रीहरीकोटा :  भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोच्या १०० व्या व्या उपग्रहाचं प्रक्षेपण नुकतेच झाले आहे. दरम्यान  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले इस्त्रोचे अभिनंदन केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'इस्त्रोच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो. नववर्षातील या यशामुळे आपले नागरिक, शेतकरी, मच्छिमार, देशाच्या अंतराळ तंत्रज्ञान यांना जलद प्रगतीचा लाभ मिळणार आहे.'



सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी PSLV C 40 या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं कार्टोसॅट २ उपग्रह अवकाशात झेपावले.  




हवामान निरीक्षण


 हवामान निरीक्षणासाठी उपयोगात आणला जाणारा हा उपग्रह इस्रोच्या ताफ्यातला १०० वा उपग्रह आहे. या उपग्रहासह देश-विदेशातले अन्य ३० उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्यात आल


काऊंटडाऊन सुरू


श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावर पहाटे ५ वाजून २९ मिनिटांनी या प्रक्षेपणाचं २८ तासांचं काऊंटडाऊन सुरू झालंय.


कॅनडा, फिनलंड, फ्रान्स, कोरिया, ब्रिटन आणि अमेरिकेच्या उपग्रहांसह भारताचा एक मायक्रो आणि एक नॅनो उपग्रह सोडण्यात येणार आहे. या ३१ उपग्रहांचं एकूण वजन १ हजार ३२३ किलो आहे.